कॉलेज फ्रेंडसोबत लिव्ह इन अन् लग्न केले दुसरीशी; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 07:36 IST2024-02-10T07:35:54+5:302024-02-10T07:36:27+5:30

तरुणीवर अत्याचार, तरुणावर गुन्हा

Lived in with college friend and married another; Filed a case | कॉलेज फ्रेंडसोबत लिव्ह इन अन् लग्न केले दुसरीशी; गुन्हा दाखल

कॉलेज फ्रेंडसोबत लिव्ह इन अन् लग्न केले दुसरीशी; गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क 
सोलापूर : एकाच कॉलेजमध्ये, एका वर्गात शिकल्याने ओळख झाली. पुढे प्रेमात रूपांतर झाले. लग्न करण्याचे ठरवून लिव्ह इनमध्ये राहू लागले अन् गुपचूप प्रियकरानं दुसरं लग्न केलं. तो ते लग्न लपवून तिच्याशी अतिप्रसंग करीत राहिला. दहा वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. सोशल मीडियावरून त्याचं लग्न झाल्याचं समजल्यानंतर  फसवणूक केल्याची तक्रार सोलापुरातील पण सध्या पुण्यात नोकरी करणाऱ्या तरुणीने केली. फौजदार चावडी पोलिसात याप्रकरणी फिर्याद देण्यात आली आहे. 

याप्रकरणी  अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ईश्वर दत्तात्रय पिंगळे असे या तरुणाचे नाव आहे.  फिर्यादी व आरोपी दोघे सोलापूर शहरातीलच आहेत. 

महिलेचे नाव शोधले
मुलगा पीडितेस लग्नाचे आमिष दाखवत होता. दरम्यान, त्याच्या मोबाइलवर एका महिलेच्या नावाने फोन येत होता. मुलीस संशय आल्याने तिने संबंधित महिलेचे नाव सोशल मीडियावर शोधले. तिला मुलाचा व त्याच्या पत्नीचा फोटो दिसून आला. 

Web Title: Lived in with college friend and married another; Filed a case