मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तावरून परतणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 22:41 IST2019-04-10T22:40:07+5:302019-04-10T22:41:08+5:30
सोलापूर- अक्कलकोट रोडवरील कोन्हाळी गावाजवळ झाला अपघात

मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तावरून परतणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या बंदोबस्तावरुन पोलीस कर्मचारी आरती साबळे यांचं अपघाती निधन झालं. मुख्यमंत्री आज अक्कलकोटमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी जिल्ह्यातील पंढरपूर आणि अक्कलकोटमध्ये मुख्यमंत्र्यांचा सभा झाल्या. या सभेसाठी मोठी पोलीस बंदोबस्त तैनात होता. अक्कलकोटच्या बंदोबस्तावरुन परतत असताना सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील महिला कर्मचारी आरती साबळे यांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला.
पोलिस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या आरती साबळे या मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आज सकाळीच आपल्या दुचाकीवरुन अक्कलकोटला गेल्या होत्या. मुख्यमंत्र्यांची सभा आटोपून सोलापूरकडे परतत असताना आरती साबळेंच्या दुचाकीला कोन्हाळी ता.अक्कलकोट येथे अपघात झाला. यामध्ये आरती साबळेंचा मृत्यू झाला. आरती साबळेंच्या मृत्यूने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.