शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

कुरनूर धरण आटले; अक्कलकोटवर जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 5:09 PM

वजा सहा टक्के पाणीसाठा : नागरिकांसह जनावरांची भटकंती, कर्ज काढून पाईपलाईन केलेल्या शेतकºयांना फटका

ठळक मुद्देयंदाच्या मोसमातील एकापाठोपाठ एक अशी जवळपास सर्वच नक्षत्रे वाया गेलीअत्यल्प पावसाच्या जोरावर अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी वरदायिनी ठरलेले कुरनूर धरण जेमतेम २३ टक्के भरले बोरी आणि हरणा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यातच धरणाने देखील तळ गाठल्याने गावोगावी पाणीटंचाई निर्माण झाली

शंभुलिंग अकतनाळ

चपळगाव : यंदाच्या मोसमातील एकापाठोपाठ एक अशी जवळपास सर्वच नक्षत्रे वाया गेली. परिणामी अत्यल्प पावसाच्या जोरावर अक्कलकोट तालुक्यातील जनतेसाठी वरदायिनी ठरलेले कुरनूर धरण जेमतेम २३ टक्के भरले गेले. सद्यस्थितीत पाण्याचा उपसा, बाष्पीभवनामुळे धरणात वजा सहा टक्केच पाणी शिल्लक असल्याने आतापासूनच अक्कलकोट तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच विशेष म्हणजे पशू-प्राण्यांना पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे हाल सोसावे लागत आहेत. यामुळेच अक्कलकोट तालुक्यात सर्वत्र भयावह स्थिती निर्माण झाली आहे. 

बोरी आणि हरणा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यातच धरणाने देखील तळ गाठल्याने गावोगावी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेतातील पिके करपली आहेत. पाणीच नसल्याने उद्योगधंद्यावर विपरीत परिणाम झाला आहे. बँकेचे कर्ज काढून धरणातून जलवाहिनी नेलेल्या शेतकºयांनी चांगलाच धसका घेतला आहे. डोक्यावर कर्जाचा बोजा आणि एकीकडे दुष्काळजन्य परिस्थिती, पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली.

जे पीक हाती आले त्यास बाजारभाव मिळाला नाही. यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे याची चिंता बहुसंख्य शेतकºयांना लागली आहे. अक्कलकोट शहरास पाणीपुरवठा करणाºया चार महत्त्वाच्या जलाशयांपैकी कुरनूर धरण महत्त्वाचे आहे. या धरण क्षेत्रातच नगरपरिषदेने मोठी विहीर खोदली आहे. मात्र धरणातील पाणी आटत चालल्याने विहिरीतील पाणीपातळीत लक्षणीय घट होत चालली आहे. 

काही ठिकाणी दूरवर खड्डे मारून पाणी उपसण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. परंतु धरणातील पाणी आटत चालल्याने भूजल                     पातळीही कमी झाली आहे.  यामुळे भविष्यात अक्कलकोटवासीयांसह संपूर्ण तालुक्याच्या संकटात मोठी वाढ होणार आहे.

 

पाणीस्रोत आटले- तब्बल ८२२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या कुरनूर धरणाचा विशेषकरून चपळगाव, बावकरवाडी, हन्नूर, बºहाणपूर, कुरनूर, दहिटणे, मोट्याळ, डोंबरजवळगे, दर्शनाळ, बोरेगाव, चपळगाववाडी यांसह अनेक गावांतील बळीराजांना फायदा झाला आहे. मात्र यंदा धरणातील पाणी आटल्याने भूजल पातळीत कमालीची घट होऊन परिणामी पंचक्रोशीतील विहिरी, कूपनलिका, ओढे, तलाव, लघु प्रकल्प, मध्यम प्रकल्पासह इतर स्रोत कोरडेठाक पडले आहेत.

कुरनूर धरणातील पाणी आटत चालल्याने पिण्याच्या पाण्यासह  जनावरांचे हाल होत आहेत. चारा कोठून आणायचा, हा सुद्धा प्रश्न आहे. कडब्याचे भाव गगनाला भिडल्याने आम्ही पशुपालक संकटात आहोेत. प्रशासनाने गटानिहाय चारा छावण्या सुरू कराव्या.         -उमेश पाटील, माजी सरपंच, चपळगाव

यावर्षी धरणात पाणीच नसल्याने हातची पिके गेली. शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. चाºयाचा प्रश्न गंभीर आहे. धरणातील अत्यल्प पाणीसाठ्यामुळे हा भाग संकटात सापडला आहे.-विश्वनाथ भरमशेट्टी, हन्नूर

टॅग्स :Solapurसोलापूरwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ