शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

किडनी दानातून तिने दिला मुलाला पुनर्जन्मत्र, सोलापूरातील घटना, यशस्वी प्रत्यारोपन शस्त्रक्रिया

By admin | Published: March 25, 2017 10:38 AM

किडनी दानातून तिने दिला मुलाला पुनर्जन्मत्र, सोलापूरातील घटना, यशस्वी प्रत्यारोपन शस्त्रक्रिया

किडनी दानातून तिने दिला मुलाला पुनर्जन्मत्र, सोलापूरातील घटना, यशस्वी प्रत्यारोपन शस्त्रक्रियासोलापूर : आईसाठी मूल हे सर्वस्व असते़ त्याच्या भल्यासाठी कोणतेही दिव्य करण्याची आईची तयारी असते़ अशाच एका आईने स्वत:ची किडनी देऊन आपल्या तरुण मुलास पुनर्जन्म दिला आहे़ चपळगाववाडी (ता़ अक्कलकोट) येथील अक्षय गोविंदे (वय २२) हा डिप्लोमाधारक तरुण दोन वर्षांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होता़ सतत डायलिसीसचा उपचारही त्याच्यासाठी निकामी ठरत होता़ अशावेळी किडनी प्रत्यारोपणाशिवाय अन्य पर्याय नसल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला़ ४ थी पर्यंत शिक्षण घेतलेल्या महानंदा गोविंदे (वय ५१) अक्षयची आई किडनी देण्यासाठी पुढे सरसावली़ आपल्या मुलाला स्वत:ची किडनी देऊन त्याला पुनर्जन्म देण्याचा आनंदही या मातेने याची डोळा अनुभवला़ सोलापूरच्या यशोधरा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली़ अक्षयच्या आजाराने गोविंदे कुटुंब अस्वस्थ होते़ वडील शिवशरण गोविंदे प्राथमिक शिक्षक आहेत़ वडील, मोठा भाऊ अविनाश, आई महानंदा या तिघांनी अक्षयला किडनी देण्याची तयारी दर्शविली होती; मात्र वडील मधुमेही रुग्ण, भावाचे नुकतेच लग्न झालेले त्यामुळे आईने स्वत:ची किडनी देण्याचा आग्रह धरला़ गुरुवारी यशोधरा हॉस्पिटलमध्ये आई महानंदा हिची किडनी काढण्यात आली़ त्यानंतर काही वेळातच अक्षयवर प्रत्यारोपण करण्यात आले़ २४ तासात दोघांची प्रकृती पूर्ववत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले़ या किडनी प्रत्यारोपण मोहिमेत डॉ़ बसवराज कोल्लूर, डॉ़ हेमंत देशपांडे, डॉ़ विठ्ठल कृष्णा, डॉ़ विजय शिवपुजे, डॉ़ पीयूष किमीतकर, डॉ़ सुरेश कट्टीमनी, डॉ़ राहुल स्वामी, डॉ़ मंजिरी देशपांडे, डॉ़ प्रणिता, प्रशासकीय अधिकारी इ विजय चंद्रा आदींनी सहभाग घेतला होता़ --------------------सोलापुरात गरजू रुग्णांना कमी खर्चात डायलिसीस, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आदी उपचार करण्याचा आमचा प्रयत्न आहे़ अक्षय गोविंदेच्या कुटुंबीयांनी अवयवदान चळवळीस बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे़ ही चळवळ अनेकांना जीवनदान मिळवून देते़- डॉ़ बसवराज कोल्लूर, किडनी तज्ज्ञ, यशोधरा हॉस्पिटल, सोलापूऱ----------------------अक्षयला होणारा त्रास पाहवत नव्हता़ त्याला किडनी देण्याचा निर्णय मी घेतला़ माझ्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत अभिमानास्पद आहे़ त्याला नवजीवन मिळाल्याने माझेही जीवन सार्थकी लागले़-महानंदा गोविंदे, किडनीदाता (अक्षयची आई)