शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

'उड्डाण पुलाखाली' चिमण्यांसाठी 500 किलो ज्वारीचा चारा बांधतोय 'दिलदार शेतकरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 16:26 IST

गावच्या उड्डाणपूलाखाली चिमण्यांनी केली वस्ती  : पक्षीप्रेमापोटी  ज्वारीच्या ताटवे बांधून केली खायची सोय      

सोलापूर - वाढत्या सिमेंटच्या  इमारतींमुळे शहरातून चिमण्यांची संख्या रोडावली आहे. चिमण्या या निसर्गचक्रातील महत्वाचा घटक आहेत . शेतीला उपद्रवमूल्य असलेले कीटक, नाकतोडे  यांचे भक्षण करीत रोगराईपासून शेतीचे रक्षण करण्याचे महत्वाचे काम चिमण्या करतात. अन्नसाखळीतील त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे .पक्षीप्रेमापोटी आपल्या शेतातील पाचशे किलो ज्वारी दरवर्षी चारा म्हणून देणारा हगलूर येथील प्रभाकर शिंदे या दानशूर  शेतकऱ्यांने यंदा गावच्या उड्डाणपूलाखाली ज्वारीचे ताटव्यांचे तोरण बांधून त्यांच्या खायची सोय केली आहे .                   सोलापूर तुळजापूर रस्त्यावरील हगलूर हे हजार पंधराशे लोकसंख्या असलेले गाव. रत्नागिरी ते नागपूर हा महामार्ग  या गावावरून जातो .नुकत्याच झालेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाने गावाजवळ उड्डाणपूल झाले. त्या पुलाच्या भिंतीतुन पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी  पाच ते सहा इंची पाइप टाकून वाट करून देण्यात आली आहे. त्या पाइपचे सत्तर ते ऐशी छिद्रे तैयार झाली असून तीच संधी साधून चिमण्यांनी इथे आपली वस्ती केली आहे. प्रत्येक छिद्रात चिमणा-चिमणी सुरक्षित राहत आहेत. विणीचा हंगाम असल्याने  अंडी अन पिलांच्या सुरक्षित्यासोबत त्यांना उब मिळण्यासाठी आसपास भटकंती करीत गवताच्या काड्या गोळा करून घरट्यात ठेवत आहेत. जवळपास दोनशे चिमण्या इथे वस्ती करून राहत आहेत .त्यांच्या चारापाण्याची सोय गावातील शेतकरी प्रभाकर शिंदे यांनी उत्तमरीत्या केली आहे .घरट्याच्या वरील बाजूस ज्वारीचे ताटवे बांधले असून त्यावर ताव मारण्यात चिमण्या गर्क असल्याचे दिवसभर दिसून येते .नेहमी शेतातील पक्षांना तांदूळ, गहू, ज्वारी देणाऱ्या शिंदे याना यंदा प्रथमच पुलाखालील चिमण्यांची वस्ती पाहून त्यांच्या चारापाण्याची सोय करावी असे सुचले .गावकऱ्यांच्या मदतीने पंधरा ते वीस फूट उंच ज्वारीचे ताटवे बांधले .सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाला .जसजसे त्यांच्या अंगवळणी पडले तसे चिमण्यां खाण्यासाठी तुटून पडत आहेत .ताटव्यांतील दाणे संपले की पंधरा वीस दिवसांनी ते बदलून नवीन ताटवे बांधत असल्याचे  प्रभाकर शिंदे यांनी सांगितले .या शेतकऱ्याची दानत पाहता निसर्गचक्र अबाधीत राहण्यासाठी पशुपक्ष्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून ती सर्वाची सामूहिक जबाबदारी हाच संदेश या सहजकृतीतून मिळतो.

मानवी वस्तीशी सलगी करून राहणाऱ्या  शहरातून चिमण्यांची संख्या रोडावली असा एक मतप्रवाह मागील काही वर्षांपासून ऐकावयास मिळत आहे .मोबाईलच्या रेडीयशनचा त्यांना त्रास होतो असा निष्कर्षही काढण्यात आला. पण अलीकडच्या काळात मात्र मोबाईल च्या टॉवरवरच चिमण्यां व इतर पक्ष्यांचे थवे दिसून येत आहेत .त्याना त्याची सवय झाल्याने शहरात ही झाडी झुडपे,पाणथळ असलेल्या ठिकाणी चिमण्यांचे थवे दिसून येत असल्याचे सकारात्मक चित्र पहावयास मिळत आहे. निवाऱ्याच्या सोयीअभावी  शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात शेतशिवारात मात्र त्यांची लक्षणीय वाढ होत आहे. 

प्रभाकर शिंदे, शेतकरी हगलूर मला लहानपणापासून पक्ष्यांना चारा घालण्याची सवय आहे. वाढवडीलांकडून ही शिकवण मिळाली असून त्यातून बरकत मिळते असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मी माझ्या शेतातील पिकांवरील दाणे खाणाऱ्या पक्षाना मनसोक्त खाऊ देतो. तसेच पाच क्विंटल ज्वारी दरवर्षी या चिमण्या आणि इतर पक्ष्यांकरिता खाण्याकरिता उपलब्ध करून देतो. यातच मला समाधान मिळते .

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज