शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! कर्नाटक करतयं सोलापूरकरांच्या हक्काचं दररोज २१५ एमएलडी पाण्याची चोरी

By appasaheb.patil | Updated: March 26, 2023 15:18 IST

सोलापूर शहराला औज धरणातून आलेल्या पाण्याच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो.

सोलापूरकर्नाटक सरकार दररोज औज बंधाऱ्यातून चक्क २१५ एमएलडी पाणी उपसा करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल तयार केला असून तो अहवाल लवकरच लवादाकडे सादर करून संबंधितांविरोधात  तक्रार करण्यात येणार असल्याचेही सांगितले. 

सोलापूर शहराला औज धरणातून आलेल्या पाण्याच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. दरवर्षी पाच वेळा उजनी धरणातून सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पाणी सोडले जाते. मात्र, कर्नाटकातील लोक पाणी उपसा करीत असल्यामुळे शहरात येणारे पाणी कमी प्रमाणात येत आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. औज धरण परिसरात कर्नाटकचे लोक ९ तलाव भरण्यासाठी १०० एमएलडी पाणी घेतात. शिवाय साखर कारखाना, इंडीसह सात गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठीही पाणी उपसा केला जातो. त्यामुळे दररोज कर्नाटक २१५ एमएलडी पाणी उपसा करीत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

महापालिका औज बंधाऱ्यातून जेवढे पाणी घेते तेवढ्या प्रमाणात पाटबंधारे विभागाकडे पैसे भरते. साधारण वर्षाला अडीच कोटी रूपये महापालिका पाण्यासाठी खर्च करीत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कर्नाटक सरकार पाणी घेते. मात्र, पैसे देते की नाही याबाबत कल्पना नसल्याचेही सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीKarnatakकर्नाटक