Kalburgi-Solapur passenger train canceled; Changes to the schedule of other trains | कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रेल्वे रद्द; अन्य गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रेल्वे रद्द; अन्य गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

ठळक मुद्देसोलापूर-वाडी सेक्शनमध्ये बोरोटी रेल्वे स्टेशन यार्डमध्ये १८ सप्टेंबर २०१९ रोजी (सकाळी ११़२० ते ५़२० वाजेपर्यंत) ट्रॅफिक ब्लॉक सोलापूर स्थानकावरून गाडी क्रमांक ५७१३४ रायचूर-विजापूर पॅसेंजर म्हणून आपल्या निर्धारित वेळेत सुटणार

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील सोलापूर-वाडी सेक्शनमध्ये बोरोटी रेल्वे स्टेशन यार्डमध्ये १८ सप्टेंबर २०१९ रोजी (सकाळी ११़२० ते ५़२० वाजेपर्यंत) ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये बदल करण्यात आला असून, गाडी क्रमांक ५७६२८ कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
दरम्यान, ब्लॉक काळात गाडी क्रमांक ५७१३४ रायचूर-विजापूर पॅसेंजर कलबुर्गी स्थानकापर्यंत धावणार आहे. सदर गाडी कलबुर्गी स्थानकावरून गाडी क्रमांक ५७१३३ विजापूर-रायचूर पॅसेंजर म्हणून निर्धारित वेळेत सुटणार आहे. कलबुर्गी ते सोलापूर स्थानकादरम्यान गाडी क्रमांक ५७१३४ ही धावणार नाही़ याशिवाय गाडी क्रमांक ५७१३३ विजापूर-रायचूर पॅसेंजर सोलापूर स्थानकापर्यंत धावणार आहे़ ही गाडी सोलापूर स्थानकावरून गाडी क्रमांक ५७१३४ रायचूर-विजापूर पॅसेंजर म्हणून आपल्या निर्धारित वेळेत सुटणार आहे़ सोलापूर ते कलबुर्गी स्थानकादरम्यान गाडी क्रमांक ५७१३३ विजापूर-रायचूर पॅसेंजर धावणार नाही.

गाडी क्रमांक ५७१३० हैदराबाद-विजापूर पॅसेंजर कलबुर्गी स्थानकापर्यंतच धावणार आहे. ही गाडी कलबुर्गी स्थानकावरून गाडी क्रमांक ५७१३३ विजापूर-रायचूर पॅसेंजर म्हणून आपल्या निर्धारित वेळेत सुटणार आहे. कलबुर्गी ते विजापूर स्थानकादरम्यान गाडी क्रमांक ५७१३० हैदराबाद-विजापूर पॅसेंजर गाडी धावणार नाही. गाडी क्रमांक १८५२० एलटीटी-विशाखापट्टणम एक्स्प्रेस सोलापूर-बोरोटी स्थानकादरम्यान अडीच तास उशिराने धावणार आहे. गाडी क्रमांक १६५०१ अहमदाबाद-यशवंतपूर एक्स्प्रेस सोलापूर-बोरोटी स्थानकादरम्यान पाऊण तास उशिराने धावणार आहे़ गाडी क्रमांक ११३०१ मुंबई-बेंगलूर उद्यान एक्स्प्रेस ही गाडी ४० मिनिटे उशिराने धावणार आहे़ गाडी क्रमांक ११०२८ चेन्नई-मुंबई एक्स्प्रेस ४० मिनिटे उशिराने धावणार आहे. तरी प्रवाशांनी बदल व रद्द झालेल्या गाड्यांची माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.

Web Title: Kalburgi-Solapur passenger train canceled; Changes to the schedule of other trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.