सकारात्मता मानसिकता ठेवल्यास कॅन्सरमुक्त होणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:24 AM2021-02-11T04:24:34+5:302021-02-11T04:24:34+5:30

या शिबिराचे उद्घाटन मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ. राहुल मांजरे, बार्शीच्या नर्गिस दत्त मेमोरियलचे कॅन्सरतज्ञ डॉ. ...

It is possible to get rid of cancer if you keep a positive mindset | सकारात्मता मानसिकता ठेवल्यास कॅन्सरमुक्त होणे शक्य

सकारात्मता मानसिकता ठेवल्यास कॅन्सरमुक्त होणे शक्य

Next

या शिबिराचे उद्घाटन मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ. राहुल मांजरे, बार्शीच्या नर्गिस दत्त मेमोरियलचे कॅन्सरतज्ञ डॉ. अमित इनामदार व जगदाळेमामा हॉस्पिटलचे मानसोपचारतज्ञ डॉ. महेश देवकते यांच्या हस्ते झाले. यावेळी कॅन्सर फाउंडेशनचे महेश कोठारी, डॉ. महेश खडके, संजय तोडकर, डॉ. उमेश झाडबुके, तन्वीर मुलाणी, संजय अदापुरे, मारुती भानवसे, डॉ.आनंद खडके, ओम स्वामी, आशुतोष क्षीरसागर, किरण कांबळे उपस्थित होते.

डॉ. इनामदार यांनी कॅन्सर हा आजार योग्य ती काळजी घेऊन, आहार व व्यायाम तसेच सकारात्मक मानसिकता ठेवून पूर्णपणे बरा होऊ शकतो तसेच नंतर सामान्य आयुष्य जगू शकतो हे अनेक उदाहरणासह पटवून दिले.

डॉ. मांजरे यांनी अत्याधुनिक उपचारपद्धती, तसेच सकारात्मक मानसिकता यातून कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो याचा विश्वास उपस्थितांना दिला. डॉ. देवकते यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून मनोधैर्य वाढविण्यासाठी काय करता येऊ शकते हे दाखविले.

केशर क्षीरसागर आणि मनिषा देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले.

कॅन्सर जनजागृतीसाठी योग्य ते कार्यक्रम, तपासणी शिबिरे, गर्भाशय कॅन्सर विरोधी लसीकरण मोहीम हाती घेऊन टेंभूर्णी आणि परिसर कॅन्सरमुक्त करण्याचे आमचे ध्येय असल्याचे कॅन्सर फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रास्ताविक अध्यक्ष योगेश भणगे यांनी केले.

सूत्रसंचलन महादेव पवार आणि सोमेश्वर तोडकर यांनी केले तर आभार डॉ. विनायक गंभीरे यांनी मानले. शिबिरासाठी योगेश भणगे, श्रीकांत लोंढे, डॉ. विनायक गंभीरे, सुनील महामुनी, महेश कोकीळ, पारस कटारिया, गोवर्धन नेवसे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: It is possible to get rid of cancer if you keep a positive mindset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.