शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

मुलाखत ; कोणत्याही वयात उद्भवतो संधिवाताचा धोका - डॉ. मुकुंद राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 10:39 AM

बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि बाह्य रोगांचे आक्रमण

ठळक मुद्देबदलत्या जीवनशैलीमुळे व आहारातील बदलामुळे सगळे जीवनचक्रच बदललेआपल्या शरिराला व्यायामाची सवय नसेल तर स्नायू कमजोर होऊन सांध्यावर दबाव येतोमुळात हा आजार एका आजाराशी निगडीत नसून शरिरीतील हाडांच्या बळकटीशी निगडित आहे

बाळासाहेब बोचरे 

सोलापूर : वयोमानानुसार  सांध्यांची झीज होऊन सांधे दुखतात. तरुण वयात व वृध्दपणातही सूज येणाºया संधीवाताचे आजार  होण्याचा धोका आता वाढला आहे. व्यायामाचा अभाव आणि  नवनवीन आजारामुळे त्याचा सांध्यावर होणारा परिणाम  हा कोणत्याही वयात होतो आणि संधीवाताचा आजार बळावतो, असे सोलापुरातील ख्यातनाम फिजीशियन संधिवात आजाराविषयी प्रक्षिशित डॉ. मुकुंद राय यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. आज जागतिक संधीवात दिनाच्या पार्श्वभूमीवर याबाबत त्याच्याशी सविस्तर केलेली बातचीत.

प्रश्न : संधीवात हा आजार वृध्दापकाळातच जाणवतो हे खरे का?डॉ. राय- तसे काही नाही. वृध्दापकाळात  होणारा संधीवात हा सांध्यामध्ये निर्माण झालेल्या झीजेमुळे होतो. पण कमी वयात सांध्यावर आक्रमण करणारे अनेक घटक वातावरणात आहेत. जसे की अलिकडे चिकनगुन्या सारखे आजार सांध्यांवर आक्रमण करतात. ताप आणि सांध्यामध्ये सूज आल्याने अशा आजारावर वेळीच उपचार न केले तर सांधे निकामी होण्याचा धोका उद्भवतो.  

प्रश्न: संधीवाताचा धोका कधी ओळखावाडॉ. राय: सर्वात जास्त प्रमाणात लक्ष वेधून घेणारा व लवकर इलाज करणे आवश्यक असणारा प्रकार म्हणजे सूज आणणारे प्रकार.  या आजारात सांध्यामध्ये दाह निर्माण होऊन सांधे खराब होतात व व्यंग निर्माण होऊन सांधे कायमचे निकामी होऊ शकतात. राञी सांधे दुखणे.. त्यामुळे झोप न लागणे,सकाळी उठताना सांधे बराच काळ आखडलेले असणे, रोजची कामे करताना ञास होणे, ही या सूज संधिवाताची लक्षणे आहेत. त्याकडे गांभीर्यानेलक्ष दिले पाहिजे. व वेळीच इलाज करणे आवश्यक असते. ही सांध्यामधील सूज आपल्या पूर्ण शरीरातील अनेक अवयवांना इजा पोहोचवू शकते.

प्रश्न: यावरील औषधांचे दुष्परिणाम होतात का? डॉ. राय: शरिराच्या व आजाराच्या आवश्यकतेनुसारच औषधे घेतलेली बरी. आणि हे समजण्यासाठी वेळो वेळी डॉक्टरांकडून चाचण्या करुन घेणे आवश्यक असते. उगीच औषधांचा अतिरेक  होणार नाही यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणेच उत्तम ठरते. 

प्रश्न: सांधेदुखी होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी.डॉ. राय: मुळात हा आजार एका आजाराशी निगडीत नसून शरिरीतील हाडांच्या बळकटीशी निगडित आहे. आज अनेक आजार आहेत की ते हाडांवर व सांध्यावर परिणाम करतात.  ज्या त्या आजाराची वेळच्या वेळी काळजी घेणे गरजेचे आहे. १६ वषार्खालील मुले, गरोदर स्त्रिया, यांनी हाडांच्या बळकटीसाठी चौरस आहार घेणे आणि स्रायू व सांध्यांची हालचाल  करणे आवश्यक असते. मी परत एकदा सांगू इच्छितो की साधी सांधेदुखी वेगळी व सूज येऊन नुकसान करणारा संधिवात वेगळा. 

प्रश्न: सांधेदुखीवर घरगुती उपाय केले जातात ते योग्य आहे का? डॉ. रॉय: घरगुती उपचारामुळे कोणाला आराम मिळाला असेल पण मूळ आजार तसाच राहिलेला असतो. त्यामुळे तो तात्पुरता उपाय ठरू शकतो कायमचा नव्हे.

अल्पवयात का उद्भवतो संधीवात?- बदलत्या जीवनशैलीमुळे व आहारातील बदलामुळे सगळे जीवनचक्रच बदलले आहे. आपल्या मूळ शरीररचना किंवा उपजत जनुकीय दोषाला पर्यावरणातील काही घटक  खतपाणी घालतात आणि  संधिवाताची सुरुवात होते. आपल्या शरिराला व्यायामाची सवय नसेल तर स्नायू कमजोर होऊन सांध्यावर दबाव येतो.त्यामुळे सांधेदुखी होते सकस आहाराअभावी शरिरामध्ये ड जीवनसत्वाची व इतर घटकांची कमतरता असेल तर हाडाचे व सांध्यांचे रोग होण्याचा संभव असल्याचे डॉ. मुकुंद  रॉय यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यMedicalवैद्यकीय