शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भारत हिंदू राष्ट्र होणे आवश्यक

By admin | Updated: January 6, 2015 23:59 IST

हेमंत मणेरीकर : मालवणात हिंदू जनजागृती समितीची सभा

मालवण : हिंदू धर्माला बळकटी आणण्याकरीता व भारत देशाच्या प्रगतीकरीता हिंदू बांधवांनी संघटीत होणे गरजेचे आहे. भारत देश आज अनेक समस्या व विकृतींनी जखडला गेला आहे. यातून देशाची मुक्तता करावयाची असल्यास भारत हे हिंदू राष्ट्र होणे आवश्यक आहे, असे विचार हिंदू धर्म प्रचारक हेमंत मणेरीकर यांनी मालवण येथे पार पडलेल्या हिंदू धर्म जागृती सभेत व्यक्त केले.हिंदू जनजागृती समितीच्यावतीने मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या पटांगणावर रविवारी हिंदू धर्म जागृती सभा पार पडली. यावेळी स्वाती खाडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे सदस्य तसेच मालवण तालुक्यातील बहुसंख्य हिंदूधर्मीय नागरिक उपस्थित होते.यावेळी बोलताना हेमंत मणेरीकर म्हणाले, हिंदू धर्मातील लोक संघटीत नसल्याने त्याचा फायदा दुष्ट प्रवृत्तीकडून घेतला जात आहे. त्यामुळे हिंदूंनी संघटीत होऊन एकजुटीने अशा दुष्ट प्रवृत्तींना हद्दपार केले पाहिजे. त्यासाठीच हिंदूंमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी अशा सभा आयोजित केल्या जात आहे. आज देशात हिंदुत्ववादी पक्षांचे सरकार आहे. तरीही अशा सभा घ्याव्या लागत आहेत. आज हिंदू धर्मावर गोहत्या, धर्मांतरण, दहशतवाद लव जिहाद अशाप्रकारे विविध मार्गांनी अत्याचार होत आहेत. यामुळे केवळ भारतातीलच नव्हे तर पाकिस्तान व बांग्लादेश या देशांमध्ये राहणाऱ्या हिंदुंचेही जगणे मुश्किल झाले आहे. धर्मनिरपेक्षता व सर्वधर्मसमभाव यांच्या विळख्यात हिंदू धर्म सापडला आहे. यामुळे भारतात अत्याचार, दहशतवाद, भ्रष्टाचार, घोटाळे असे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे भारताला सुस्थितीत आणण्यासाठी हिंदू राष्ट्र होणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदू धर्मवीर निर्माण झाले पाहिजेत असेही मणेरीकर म्हणाले.यावेळी बोलताना स्वाती खाडे म्हणाल्या, आज हिंदूधर्मीय पाश्चात्य प्रवृत्तींच्या आहारी जात आहेत. त्यामुळे हिंदू संस्कृतीला धोका निर्माण होत आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदूधर्मीय अशा प्रवृत्तींकडे ओढले जात आहेत. हिंदूच्या परंपरा व सणांवर काही धर्मद्रोही आरोप करून पर्यावरणाच्या नावाखाली हिंदूधर्मियांना फसवत आहेत. हिंदू देवतांच्या मूर्ती, मंदिरे यांची धर्मद्रोही लोकांकडून विटंबना केली जात आहे. मात्र, याबाबत कोणीही पुढे येवून आवाज उठवित नाही. त्यामुळे हिंदू धर्म व हिंदू संस्कृती निरंतर टिकविण्यासाठी भारत हे हिंदू राष्ट्र म्हणून अस्तित्वात येणे गरजेचे आहे. यासाठी हिंदूंनी संघटीत व्हावे तसेच हिंदू जनजागृती समिती हिंदू राष्ट्र निर्माण होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असेही स्वाती खाडे म्हणाल्या. (प्रतिनिधी)