शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

एक्झिट पोलनंतर सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघात वाढली उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:13 PM

खासदार कोण ?.. व्यक्त होताहेत अंदाज, राजकीय चर्चेला उधाण

ठळक मुद्देएक्झिट पोलचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडिया व नागरिकांत एकच चर्चेचा विषय सुरू झालाएक्झिट पोलच्या आकडेवारीत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला चार जागा मिळतील, असे म्हटले आहे. 

सोलापूर : लोकसभा निवडणूक निकालाला आता अवघे दोन दिवस उरलेले असताना निरनिराळ्या एक्झिट पोलने दिलेल्या आकडेवारीवरून सोलापुरातून कोण खासदार होणार, याची नागरिकांत चांगलीच चर्चा रंगली आहे. 

एक्झिट पोलचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडिया व नागरिकांत एकच चर्चेचा विषय सुरू झाला आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला चार जागा मिळतील, असे म्हटले आहे. 

या चार जागांमध्ये कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातून मोहन जोशींबरोबर सोलापुरातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे निवडून येतील, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. यु. एन. बेरिया व नगरसेवक चेतन नरोटे यांनी मतदारसंघातून घेतलेल्या आढाव्यावरून हा दावा खरा असल्याचे म्हटले आहे. मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूरमधून काँग्रेसला चांगली साथ मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असे एक्झिट पोलची आकडेवारी सांगत असल्यामुळे सोलापूरची जागा राखण्यात आम्हाला यश मिळणार आहे, असे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

भाजपचे शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी म्हणाले, आम्ही यापूर्वीच डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील, असा दावा केलेला आहे. एका सर्वेक्षणात वंचित आघाडीला एक जागा मिळेल, असे नमूद केले आहे. ही जागा सोलापूरचीच असेल, असे वंचित आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी म्हटले आहे. एक्झिट पोल सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत सोलापूरबरोबर इतर चार ठिकाणी उमेदवार विजयी होतील, असा दावा त्यांनी केला.

माढ्यामध्येही रंगतदार चर्चा..

  • - एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससाठी ९ जागा दाखविल्या आहेत. वाढीव जागांमध्ये माढा, उस्मानाबाद असेल असे म्हटले आहे.
  • - माढ्यातून कोण निवडून येणार याबाबत जिल्हा परिषदेत दिवसभर चर्चा सुरू होती. माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे निवडून येतील, असा दावा विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी केला आहे तर भाजपचे रणजित नाईक-निंबाळकर यांना माळशिरसमधून मताधिक्य असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचे झेडपी सदस्य त्रिभुवन धार्इंजे यांनी म्हटले आहे. 
टॅग्स :Solapurसोलापूरsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढाLok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९