शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई कालावधी वाढवून द्या

By admin | Updated: July 2, 2014 00:45 IST

जिल्हाधिकारी: शासनाकडे केली मागणी

सोलापूर: टंचाई कालावधीची मुदत ३० जूनपर्यंत असते; मात्र यंदा पाऊस लांबणीवर गेल्यामुळे टंचाई कालावधीची मुदत वाढवून देण्याची मागणी जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी शासनाकडे केली आहे़ हा कालावधी निश्चित वाढवून मिळेल असा विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला़ शासनाकडून ३० जून ही टंचाई निधी देण्याची अंतिम तारीख असते; मात्र जून महिना संपला तरीही पाऊस न पडल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत, चारा टंचाई, पाणीपुरवठा आदी कामांसाठी अतिरिक्त निधी लागणार असून त्यासाठी शासनाने टंचाई कालावधीची मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे़ सध्या बोरी, येवती तलावातील पाणी उपसा बंद करण्यात आला आहे़ तलावातील पाणी केवळ पिण्यासाठीच वापरावे असे नियोजन केले जात आहे़ पाणी उपसा बंदी करावी अशा सूचना तहसीलदारांना दिल्याचे गेडाम म्हणाले़ भीमा-सीना जोडकालव्यातून पाणी सोडण्याची मागणी सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांनी केली असून त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, उजनीतून पाणी सोडण्याचा अधिकार शासनाचा आहे़ शासन आदेश आल्याशिवाय आपण काही करु शकत नाही़ -------------------------आषाढीसाठी पाणीटंचाई नाहीआषाढीवारीसाठी पंढरीत पाणीटंचाई भासणार नाही़ उजनी धरणातून १ टीएमसी पाणी वारीसाठी सोडण्यात येणार असून ते २ जुलै रोजी सोडले जाण्याची शक्यता आहे़ पंढरीत शौचालये बांधण्याचे काम देखील प्रगतीपथावर असून २५०० शौचालये तयार झाली आहेत़ ४००० शौचालये उपलब्ध केली जात आहेत़ शौचालय, पाणीपुरवठा, कचरा उचलणे तसेच अतिक्रमण या चार प्रमुख बाबींसाठी प्रत्येक एका मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक केल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले़ पालखी मार्गावर ७० पाणी टँकर दिले आहेत़ -----------------------------------------स्वच्छतेवर भरपालखी तळासाठी २़२० कोटींचा निधी आषाढीवारीसाठी यंत्रणा सज्ज५००० पोलीस, ३५० सफाई कर्मचारी, २०० डॉक्टरपंढरीत एसटीच्या पत्राशेडसाठी ३५ लाख पंढरीत यंदा स्वच्छतेवर भर