शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

पुणे जिल्ह्यातील पावसाने उजनी धरणात होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 12:57 PM

आनंदाची बातमी; धरणाच्या पाणीसाठ्यात होऊ लागली हळूहळू वाढ

ठळक मुद्देगेल्या तीन दिवसांपासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात पावसाने दमदार हजेरीखडकवासला, टेमघर, पानशेत, वरसगाव आणि पवना धरणक्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊसगेल्या ४८ तासात २०० मिमी पाऊस झाला आहे तर १ जूनपासून याठिकाणी २७५ मिमी पावसाची नोंद

भीमानगर : गेल्या तीन दिवसांपासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. खडकवासला, टेमघर, पानशेत, वरसगाव आणि पवना धरणक्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असून, धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये हळूहळू वाढ होत चालली आहे.

पवना धरण परिसरात गेल्या ४८ तासात २०० मिमी पाऊस झाला आहे तर १ जूनपासून याठिकाणी २७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्व धरणात सध्या १५ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, मागील वर्षी आजच्या तारखेला २१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात गेल्या ४८ तासात तब्बल ४७५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. 

सर्वाधिक २०० मि. मी. पावसाची नोंद ही टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाली आहे. तर सर्वात कमी सुमारे १०० मिमी पाऊस हा वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाला आहे. पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे १२२ मिमी पाऊस झाला. रविवारी दिवसभर पुणे जिल्ह्यातील धरण परिसरात संततधार सुरुच होती.

या पावसाचा फायदा उजनी धरणाला होतो. कारण पुणे परिसरात पाऊस पडला की ही धरणे भरतात व ओव्हरफ्लो झाला की हे पाणी उजनी धरणात सोडून दिले जाते.

गेल्यावर्षी उजनी धरण परिसरात व सोलापूर जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस होऊन सुद्धा पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनीवरील सर्व धरणे भरून उजनीत खडकवासला, पानशेत, टेमघर,भामा आसखेड, पवना या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे उजनी धरण ११० टक्के भरले होते. रविवारी दिवसभरात उजनी धरण जलाशय परिसरात ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

उजनी धरणाची सद्यस्थितीएकूण पाणी पातळी ४७५.०९० मीटर तर एकूण पाणी साठा ९०८.६० दलघमी आहे. उपयुक्त पाणी साठा वजा ८९४.२१ दलघमी तर टक्केवारी वजा ५८.९४ टक्के, एकूण टीएमसी ३२.०८ तर उपयुक्त टीएमसी वजा ३१.५८ आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनी धरणाची टक्केवारी वजा १९.७७ इतकी होती.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीwater transportजलवाहतूकRainपाऊस