बापानेच केला पोटच्या ६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सोलापूरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 16:00 IST2018-03-30T16:00:38+5:302018-03-30T16:00:38+5:30

मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

The incident took place in Ranchi, Solapur, where a six-year-old girl was allegedly raped by her father | बापानेच केला पोटच्या ६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सोलापूरातील घटना

बापानेच केला पोटच्या ६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सोलापूरातील घटना

ठळक मुद्देसोलापुरात बाप-लेकीच्या नात्यास काळीमा फासणाºया घटनेने खळबळ गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधाम बापास अटक केली

सोलापूर : सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात राहणाºया नराधम बापाने पोटच्या ६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा लैंगिक छळ  केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे़ याप्रकरणी मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसांनी गुन्हा दाखल करून आरोपी बापाला अटक केली आहे़ सोलापुरात बाप-लेकीच्या नात्यास काळीमा फासणाºया घटनेने खळबळ उडाली आहे़

सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात महादेवी नगरात पीडित सहा वर्षाची मुलगी, तिची आई व नराधाम बाप हे तिघे एकत्र राहात होते. बाप हा मजुरीचे काम करतो तर पीडितेची आई ही घरीच असते. गेल्या काही काळापासून बापाने पोटच्या सहा वर्षाच्या मुलीवर अनेकवेळा बलात्कार करुन तिचा लैंगिक छळ केला.

ही बाब समाजात माहिती झाली तर आपलीच बदनामी होईल या भितीपोटी पीडितेची आई गप्प बसली. परंतु, तिला मुलीचा त्रास पाहवेना. अखेर तिने धाडस दाखवित नराधाम बापाविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधाम बापास अटक केली.  पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील तपास करीत आहेत.

Web Title: The incident took place in Ranchi, Solapur, where a six-year-old girl was allegedly raped by her father