रूग्णवाहिका - रिक्षाचा अपघात, चार जण जखमी, वडाळयाजवळील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 14:20 IST2018-08-06T14:19:20+5:302018-08-06T14:20:13+5:30
सोलापूर-बार्शी महामार्गावरील वडाळा गावाजवळ हा अपघात झाला

रूग्णवाहिका - रिक्षाचा अपघात, चार जण जखमी, वडाळयाजवळील घटना
सोलापूर : महाराष्ट्र आपतकालीन वैद्यकीय सेवेची १०८ रूग्णवाहिका व रिक्षाची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात रिक्षातील चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सोलापूर-बार्शी महामार्गावरील वडाळा गावाजवळ हा अपघात झाला आहे.
दरम्यान, सोलापूर-वडाळा गावाजवळ १०८ रूग्णवाहिका (एम़एच १४ सीएल ०५०९) ही सोलापूरकडे जात असताना अचानक ब्रेकफेल झाल्याने समोरून येणाºया रिक्षा (एम.एच १३ १५६७) ला धडक दिली़ या धडकेत रिक्षातील चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे़ जखमींना नागरिकांनी उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात पाठविले आहे़
सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात....