शहरात पुन्हा चैन स्नॅचिंग : एकाच दिवसात दोन महिलांच्या गळ्यातील दागिने नेले हिस्कावून

By संताजी शिंदे | Updated: July 14, 2024 19:35 IST2024-07-14T19:34:46+5:302024-07-14T19:35:09+5:30

महिलांमद्ये भितीचे वातावरण

In one day, two women's necklaces were snatched away | शहरात पुन्हा चैन स्नॅचिंग : एकाच दिवसात दोन महिलांच्या गळ्यातील दागिने नेले हिस्कावून

शहरात पुन्हा चैन स्नॅचिंग : एकाच दिवसात दोन महिलांच्या गळ्यातील दागिने नेले हिस्कावून

सोलापूर : शहरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पायी चालत जाणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील, सोन्याचे दागिने हिस्कावून नेल्या. शनिवारी एकाच दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास या घटना घडल्या. या प्रकारामुळे महिलांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.     

मिनाक्षी साहेबराव फंड (वय ४९ रा. रेल्वे पंम्प रोड, शहाबाद रेल्वे स्टेशन जवळ, ता. कलबुर्गी राज्य-कर्नाटक) या मरीआई चौकातील स्टार मॉल चौकातून जात होत्या. दरम्यान पाठीमागून नंबर प्लेट नसलेल्या मोटारसायकलवरून दोघे आले. काही कळाच्या आत त्यांनी मिनाक्षी फंड यांच्या गळ्यातील १७ ग्रॅम सोन्याची चैन हिस्कावून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौकाच्या दिशेने पोबारा केला.

पुढे जाऊन मोटारसायकलवरील चोरट्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक) येथून पायी चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची माळ हिस्कावून घेतली. तेथूनही दोघे वेगात मोटारसायकलवरून पळून गेले. या प्रकरणी मिनाक्षी फंड यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक धायगुडे करीत आहेत.

Web Title: In one day, two women's necklaces were snatched away