शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही जय महाराष्ट्र म्हणत असाल तर मीही जय महाराष्ट्र म्हणतो : दिलीप सोपल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 13:50 IST

मी पक्षामुळे नव्हे तर बार्शीकरांच्या प्रेमामुळे आमदार झालोय असे स्पष्ट मत माजी आमदार दिलीप सोपल यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे- सोलापूर मराठवाडा मित्रमंडळ, बार्शीकर मित्रमंडळ, पिंपरी-चिंचवड आयोजित स्नेहमेळावा- दिलीप सोपल शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बार्शी तालुक्यात राजकीय घडामोंडींना वेग

बार्शी : गेली ३५ वर्षे संसदीय राजकारणात मी सक्रिय आहे. मला घर, प्रपंच नसल्यानं, लोकांच्या गाठीभेटी आणि त्यांची कामं हाच माझा उद्योग आहे. मला पक्षप्रवेशासाठी सर्वच राजकीय पक्षांतून आॅफर आहे. त्यामुळे त्यासंदर्भात आपले मत विचारात घेण्यासाठी मी आलोय, असे सांगत, मी कोणत्या पक्षामुळे नव्हे तर बार्शीकरांच्या प्रेमामुळे आमदार झालोय, असे स्पष्ट प्रतिपादन आ़ दिलीप सोपल यांनी केले़ 

सोलापूर मराठवाडा मित्रमंडळ, बार्शीकर मित्रमंडळ, पिंपरी-चिंचवड आयोजित स्नेहमेळाव्यात आमदार सोपल बोलत होते. यावेळी अध्यक्ष प्रशांत जाधव, उद्योजक हनुमंत गटकळ, हेमंत गडशिंग, भाऊसाहेब कोकाटे, फफाळ उपस्थित होते़ महाराष्ट्रात पसरलेल्या बार्शीकरांना मी भेटत असतो, त्यांची प्रगती पाहून आनंद होतो, असे सोपल यांनी म्हटले.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांतून मला आॅफर आहे. मात्र, आपलं मत विचारात घ्यायला मी आलोय. बार्शीकरांच्या प्रेमामुळे आमदार झालो आहे. म्हणूनच दोनवेळा अपक्ष निवडून आलो. त्यामुळे कार्यकर्ता आणि जनमत चाचपणी करूनच आपण निर्णय घेऊ, असेही सोपल यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमातही सोपल यांनी आपल्या खास शैलीत विनोदी फटकेबाजी केली.

 तर माझाही जय महाराष्ट्र - पिंपरी-चिंचवडला आ़ सोपल हे मेळावा घेत असताना त्यांच्या निवासस्थानी आ़सोपल यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या अनुपस्थितीत विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यामध्ये शिवसेना प्रवेशासंदर्भात विचारविनिमय झाला. यावेळी बहुसंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा असा विचार मांडला़ शेवटी आ़ सोपल यांना फोन लावला हा विचार सांगितला तेव्हा तिकडून सोपल यांनी तुम्ही जय महाराष्ट्र म्हणत असाल तर मीही जय महाराष्ट्र म्हणतो़, असे शिवसेना प्रवेशाला अधिकृत दुजोराच दिला.

 

टॅग्स :SolapurसोलापूरDilip Sopalदिलीप सोपलNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकbarshi-acबरशी