जिल्हा परिषद सदस्या गोडसे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेतली व ग्रामपंचायत विभागाकडून स्मशानभूमीच्या जागेसाठी पाठपुरावा होत नसल्याची तक्रार केली. सोलापूर-रत्नागिरी महामार्ग स्मशानभूमीलगत गेल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना थांबण्यासाठी जागा नाही. महामार्ग विभागाने ओढ्यावर पाईप टाकले; पण त्याचा उपयोग होत नाही. बाजूच्या शेतकऱ्यांची दोन गुंठे जागा भूसंपादनाचा प्रस्ताव दिला; पण महामार्ग संपादनाप्रमाणे मोबदला देण्याची तयारी दर्शवूनही शेतकरी तयार होत नाहीत. या वादात शासनाकडून आलेला निधी परत गेला. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेषाधिकार वापरून भूसंपादन करावे, असे गोडसे यांनी म्हटले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}