मी अजून बारामतीचा नाद सोडलेला नाही: महादेव जानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:15 AM2021-02-22T04:15:31+5:302021-02-22T04:15:31+5:30

करमाळा (जि. सोलापूर): मी राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष व खा. शरद पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष ...

I have not left Baramati yet: Mahadev Jankar | मी अजून बारामतीचा नाद सोडलेला नाही: महादेव जानकर

मी अजून बारामतीचा नाद सोडलेला नाही: महादेव जानकर

Next

करमाळा (जि. सोलापूर): मी राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष व खा. शरद पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने अनेकवेळा कार्यक्रमात आम्ही एकत्र येतो. याचा अर्थ मी माझ्या पक्षापासून व विचारापासून दूर गेलेलो नाही. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी आपण पवारांशी जवळीक साधत आहोत, असा अर्थ काढू नये. आजही आपण बारामतीचा नाद सोडलेला नाही. २०२४ ला रासप बारामती लोकसभा मतदार संघासह राज्यातील ५ लोकसभा मतदारसंघातून उमेदवार निवडून आणण्यासाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करत आहोत, असे स्पष्ट मत रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आ. महादेव जानकर यांनी व्यक्त केले.

करमाळा तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. जानकर म्हणाले, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यासाठी खरा विरोध काँग्रेस, भाजपचा असून, या दोन पक्षामुळेच अद्यापपर्यंत ही जनगणना झालेली नाही. यासाठी आपल्या पक्षाचे २५ खासदार संसदेमध्ये निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न् करत आहोत. राज्यात भाजपा-सेना पक्षाचे सरकार असताना सर्व पक्षाच्या व घटक पक्षाच्या नेते मंडळींना विश्वासात घेऊन आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळून दिले. ते आरक्षण टिकण्यासाठी योग्य ते नियोजन करुन कोर्टामध्ये वकिलांची फौज उभी करुन मागासवर्गीय आयोग नेमून योग्य प्रकारे हे आरक्षण लागू गेले, मात्र राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर सध्याच्या तीन पक्षाच्या पायावर चालणाऱ्या सरकारने हे आरक्षण टिकविण्यासाठी विशेष असा प्रयत्न् केला नाही. त्यामुळे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. या समाजाबरोबर धनगर आरक्षणाचा विषय हा केंद्र सरकारच्या अधिकारात येते. हे आरक्षण मिळविण्यासाठी आपला पक्ष कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

माढ्यासह या पाच लोकसभा मतदारसंघातून तयारी

आगामी लोकसभेसाठी रासप माढ्यासह बारामती, परभणी, जालना, हिंगोली या पाच मतदारसंघात लोकसभा निवडणूक सर्व ताकदीनिशी लढवणार आहे. २००९, २०१४ च्या लोकसभेसाठी काही तयारी नसताना निवडणूक लढविली. २०१९ मध्ये एकही उमेदवार नव्हता, मात्र आगामी लोकसभा तयारीनिशी लढणार असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले.

Web Title: I have not left Baramati yet: Mahadev Jankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.