देशव्यापी मोर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:45 AM2018-11-26T10:45:11+5:302018-11-26T10:46:31+5:30

सोलापूर : २९ व ३० रोजी दिल्लीत होणाºया किसान मोर्चासाठी जिल्ह्यातून शेकडो शेतकरी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. शनिवारी ...

Hundreds of farmers from Solapur district will go for countrywide rally | देशव्यापी मोर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी जाणार

देशव्यापी मोर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी जाणार

Next
ठळक मुद्दे२९ व ३० रोजी होणाºया दिल्ली किसान मोर्चाला जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते सहभागी होण्याचा निर्णय याच बैठकीत सोलापूर जिल्हा ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती गठीत

सोलापूर : २९ व ३० रोजी दिल्लीत होणाºया किसान मोर्चासाठी जिल्ह्यातून शेकडो शेतकरी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. शनिवारी २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या जिल्हाभरातील विविध शेतकरी संघटनांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दत्तनगर लालबावटा कार्यालयात सिद्धप्पा कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. याच बैठकीत राज्य ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. 

२९ व ३० रोजी होणाºया दिल्ली किसान मोर्चाला जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. 
देशातील शेतकरी दुष्काळ आणि आर्थिक अरिष्टात सापडलेला आहे. त्याला दिलेली खोटी आश्वासने कधी पूर्ण करणार, याचा जाब विचारण्यासाठी देशातील सर्व शेतकरी संघटना व शेतकरी यात समावेश होत आहेत. त्यासाठी सोलापुरातून शेकडो शेतकºयांनी सहभागी व्हावे, असा विचार या बैठकीत मांडण्यात आला. 

ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची स्थापना
च्याच बैठकीत सोलापूर जिल्हा ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती गठीत करण्यात आली. पुढील महिन्यात जिल्हाव्यापी परिषद घेऊन आंदोलनाची दिशा व कार्यक्रम घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संघर्ष समितीत पदाधिकारी याप्रमाणे आहेत. जिल्हा निमंत्रक - सिद्धप्पा कलशेट्टी, अध्यक्ष - शंकर गायकवाड, अन्य पदाधिकारी- डॉ. बाळासाहेब पाटील (माढा), प्रा.एस़ एस़ जाधव (बार्शी), स्वामीनाथ शिरगुरे (अक्कलकोट), संभाजी पवार (पंढरपूर), सदस्य - डॉ.शिवानंद झळके, चाँद कोरबू, सुलेमान शेख, श्रीमंत डोमनाळे, जावेद औटी आदी.

Web Title: Hundreds of farmers from Solapur district will go for countrywide rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.