शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

उजनीतून डोकावताहेत बुडालेली घरं अन् वाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 2:33 PM

उजनी धरणातील पाणीपातळी तळपातळीकडे झपाट्याने सरकू लागल्याने धरणकाठ उघडा पडला

ठळक मुद्देकरमाळा तालुक्यात उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पोमलवाडीजवळील ब्रिटिशकालीन रेल्वे मार्गावरील पाचपुलावरील पृष्ठभाग धरणातील पाणी कमी झाल्याने उघडा पडला आहे.यंदाच्या सरलेल्या मान्सूनमध्ये उजनी धरणात १०९ टक्के पाणीसाठा झाला होताउजनी धरण मायनसमध्ये आले आहे. परिणामत: धरणाच्या पाण्याखाली बुडालेले पुरातन अवशेष पाण्याबाहेर डोकावू लागले आहेत

नासीर कबीरकरमाळा : उजनी जलाशयाची पाणीपातळी झपाट्याने खालावल्याने धरण बांधणीच्या काळात पाण्यात गेलेले जुन्या गावठाणातील वाडे, रस्ते, पुलाचे अवशेष पाण्याबाहेर डोकावू लागले आहेत. बदललेल्या मोसमात विदेशी पक्षीही मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. पाणीपातळी घटल्याने बोटीतून पाण्याची सफर व पाण्याबाहेर डोकावणाºया जुन्या वास्तू व विदेशी पक्षी पाहण्यासाठी पर्यटकांची आणि परिसरातील नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे.

यंदाच्या सरलेल्या मान्सूनमध्ये उजनी धरणात १०९ टक्के पाणीसाठा झाला होता. मार्च अखेरीस उजनी धरण मायनसमध्ये आले आहे. परिणामत: धरणाच्या पाण्याखाली बुडालेले पुरातन अवशेष पाण्याबाहेर डोकावू लागले आहेत. माढा तालुक्यातील भीमानगर येथे बांधलेले उजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोलीपर्यंत पसरलेले आहे. धरण निर्मितीवेळी करमाळा तालुक्यातील कंदर, वांगी, चिखलठाण, कुगाव, केत्तूर, पोमलवाडी, टाकळी, कोंढारचिंचोली, कात्रज, खातगाव आदी २९ गावे पाण्याखाली बुडाली. त्या गावांचे पुनर्वसन बुडालेल्या गावालगतच करण्यात आलेले आहे.

करमाळा तालुक्यात उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पोमलवाडीजवळील ब्रिटिशकालीन रेल्वे मार्गावरील पाचपुलावरील पृष्ठभाग धरणातील पाणी कमी झाल्याने उघडा पडला आहे. केत्तूर, पोमलवाडी, वांगी, कंदर येथील जुन्या वाड्यांचे अवशेष उघडे पडले आहेत. सैराट चित्रपटात चित्रित झालेला व कुगाव येथील धरणात बुडालेला इनामदारांचा वाडा, वांगीमधील हेमाडपंथी लक्ष्मीचे मंदिर, पळसदेव येथील ग्रामदैवत पळसनाथ मंदिराचे शिखर पाण्याबाहेर डोकावू लागल्याने जुन्या आठवणी ताज्या होऊ लागल्या आहेत. धरण निर्मितीनंतर तब्बल ४२ वर्षे पाण्यात बुडालेले हे अवशेष आजही इतिहासाची साक्ष देत आहेत. यापूर्वी २०१२ व २०१५ सालात धरणातील पाणीपातळी मायनसमध्ये गेल्यानंतर हे अवशेष पाण्याबाहेर आले होते.

देशी, विदेशी दुर्मिळ पक्ष्यांचा वावर

  • - उजनी धरणातील पाणीपातळी तळपातळीकडे झपाट्याने सरकू लागल्याने धरणकाठ उघडा पडला आहे. परिसरात पोषक वातावरण निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरात अनेक प्रजातींच्या पक्ष्यांचे आगमन झालेले आहे. प्रत्येक वर्षी फ्लेमिंगो या स्थलांतरित पक्ष्याबरोबरच यापूर्वी उजनी धरण परिसरात न दिसलेले दुर्मिळ पक्षी यंदा दिसू लागल्याने परिसराचे सौंदर्य खुलले आहे. शिवाय पाणीपातळी कमी झाल्याने पर्यटक बोटीतून पाण्याची सफर करू लागले आहेत.
टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक