Heavy rains shut down 1798 transformers, more than a hundred feeders | जोराच्या पावसाने १७९८ ट्रान्स्फॉर्मर, शंभराहून अधिक फिडर पडले बंद

जोराच्या पावसाने १७९८ ट्रान्स्फॉर्मर, शंभराहून अधिक फिडर पडले बंद

ठळक मुद्देज्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे तेथील दुरुस्तीची कामे वेगाने हाती घेतली आहेतसोलापूर जिल्ह्यातील आतापर्यंत ९० टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत कॉन्ट्रॅक्टर, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांची संयुक्त २५ विशेष पथके अहोरात्र तैनात करण्यात आली

सोलापूर : विजांचा कडकडाट़़़ वादळी वारे़़़जोराचा पाऊस़़़़यामुळे पंढरपूर, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा आदी भागात महावितरणचे नुकसान झाले आहे़ अवकाळी पावसामुळे १७९८ ट्रान्स्फॉर्मर, १०७ फिडर बंद पडले आहेत़ याशिवाय ५२ गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती महावितरणसोलापूरचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी ‘लोकमत’ ला दिली.

बुधवारी आणि गुरुवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाला़ पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोटसह सोलापूर शहराला पावसाने चांगलेच झोडपले़ वादळी वाºयामुळे झालेल्या पावसात महावितरणच्या विद्युत तारांसह विजेचे खांब कोसळले़ यात काही ट्रान्स्फॉर्मर, फिडर, उपकेंद्रातील साहित्यांचे नुकसान झाले़ त्यामुळे काही गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता़ अनेक भागात पाणी साचल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या कामाला अडचणी येत होत्या; मात्र महावितरणच्या कर्मचाºयांनी जिवाची पर्वा न करता विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.

२५ पथके अन् ४०० कर्मचारी...
पावसामुळे खंडित झालेल्या भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण सोलापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्ट्रॅक्टर, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी यांची संयुक्त २५ विशेष पथके अहोरात्र तैनात करण्यात आली आहेत़ याशिवाय वीज वितरणच्या ४०० कर्मचाºयांनीही दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे़ विद्युत तारा जोडणे, नादुरुस्त फिडर दुरुस्त करणे, ट्रान्स्फॉर्मर बसविणे आदी कामे पथकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत़ 

ज्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे तेथील दुरुस्तीची कामे वेगाने हाती घेतली आहेत़ सोलापूर जिल्ह्यातील आतापर्यंत ९० टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे़ वीजग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणची विशेष पथके, कॉन्ट्रॅक्टर, जनमित्र, तंत्रज्ञ, अभियंते, शाखाधिकारी अहोरात्र स्पॉटवरून उभे राहून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम करीत आहेत़
- ज्ञानदेव पडळकर,
अधीक्षक अभियंता, सोलापूर मंडल 

Web Title: Heavy rains shut down 1798 transformers, more than a hundred feeders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.