सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस; उजनी ६०.६६ टक्के भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 16:51 IST2018-08-21T16:44:39+5:302018-08-21T16:51:12+5:30
सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला़

सोलापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस; उजनी ६०.६६ टक्के भरले
ठळक मुद्देदौंड बंडगार्डन चा विसर्गात पुन्हा वाढ होण्यास सुरुवातपंढरपूर तालुक्यातील वडदेगावचा कॅनॉल पावसाच्या पाण्याने फुटल्याची माहिती
सोलापूर : सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला़ सोमवारी रात्रीपासून ते मंगळवारी दुपारपर्यंत शहर व जिल्ह्यात पावसाची कमी अधिक प्रमाणात हजेरी होती़ काही ठिकाणी जोरात तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पावसाने हजेरी लावली़ दरम्यान, पंढरपूर तालुक्यातील वडदेगावचा कॅनॉल पावसाच्या पाण्याने फुटल्याची माहिती समोर आली आहे़ या पावसामुळे शेतकरी सुखावली असून पिकांना मोठया प्रमाणात जीवदान मिळाला आहे़
उजनी धरण अपडेट़़...
दौंड बंडगार्डन चा विसर्गात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात
- - उजनी धरण :- + 62.73%
- - एकूण पाणीपातळी - 495.010 मी
- - पाणीसाठा - 2751.51 दलघमी
- - उपयुक्त पाणीसाठा - 951.70 दलघमी
- - टक्केवारी - +62.73%
- - उजनीत येणारा विसर्ग
- - दौंड : 35216 क्युसेक
- - बंडगार्डन : 36178 क्युसेक.
उजनीतुन
कालवा : 3000
बोगदा : 900
सीनामाढा : 240