मुलीला पळवून नेतो म्हणून त्रास देणाऱ्या; मजनूनं पिडितेच्या आईला दिलं ढकलून

By विलास जळकोटकर | Updated: March 30, 2024 16:59 IST2024-03-30T16:57:08+5:302024-03-30T16:59:47+5:30

तरुणाविरुद्ध विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा दाखल.

harassment as abducts the girl majnu pushed the victim mother in solapur | मुलीला पळवून नेतो म्हणून त्रास देणाऱ्या; मजनूनं पिडितेच्या आईला दिलं ढकलून

मुलीला पळवून नेतो म्हणून त्रास देणाऱ्या; मजनूनं पिडितेच्या आईला दिलं ढकलून

विलास जळकोटकर, सोलापूर : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, पळवून नेऊन लग्न करणार आहे’ असे म्हणून त्रास देणाऱ्या मजनूला जाब विचारताना त्यानं पिडितेच्या आईला व नातलगाला ढकलून देऊन जखमी केले. शहरातील एका परिसरात शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विनयभंग व बाललैंगिक छळान्वये गुन्हा नोंदला आहे. अरबाज उर्फ जाफर इम्तेयाज शेख (वय- २१) असे आरोपीचे नाव आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला वरील मजनू गेल्या महिनाभरापासून पाठलाग करीत होता. तिला ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे. महिन्यांनी तुला पळवून नेऊन लग्न करणार आहे’ असे मोबाईलवर सतत बोलून चॅटींग करुन त्राद देत होता. हा प्रकार समजल्यानंतर पिडितेची आई आणि तिची नातलग दोघे शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास त्याला जाब विचारण्यासाठी गेल्या. नमूद मजनूने चिडून पिडितेच्या आईला ढकलून दिले आणि सोबत असलेल्या नातलग महिलेला धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी पिडितेच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे, खोमणे यांनी भेट देऊन गुन्हा नोंदण्याचे आदेश दिले. या प्रकरणी तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कडू करीत आहेत.

Web Title: harassment as abducts the girl majnu pushed the victim mother in solapur