शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

गुडेवारांनी केली कारखानदारी

By admin | Updated: July 9, 2014 00:07 IST

सत्ताधाऱ्यांनी केले पुन्हा लक्ष्य: निवृत्तांच्या नियुक्तीवरून राजकारण

सोलापूर: सेवानिवृत्तांना पुनर्नियुक्तीची उच्च न्यायालयाची बंदी असताना आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी बेकायदेशीर नियुक्त्या दिल्याप्रकरणाची चौकशी करण्याचा ठराव महापालिकेच्या सभेत मंगळवारी बहुमताने मंजूर करण्यात आला. महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी महापौर अलका राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आयुक्त उपस्थित नाहीत म्हणून अंदाजपत्रक पुढे ढकलण्यात आले व आयत्यावेळचे विषय चर्चेसाठी घेण्यात आले. सभागृह नेते महेश कोठे यांनी सदस्य चेतन नरोटे, दिलीप कोल्हे यांनी दिलेला प्रस्ताव मांडला. आयुक्त गुडेवार यांनी महापालिकेत पुरेसे कर्मचारी असताना सेवानिवृत्तांची नियुक्ती केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्तांच्या नियुक्तीला बंदी असताना त्यांनी बेकायदेशीरपणे नियुक्त्या केल्या. या नियुक्त्या रद्द करून प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. चर्चेवेळी अ‍ॅड. यु. एन. बेरिया, दिलीप कोल्हे, चेतन नरोटे, देवेंद्र भंडारे यांनी विविध खात्यात अशा नियुक्त्या झाल्याचे निदर्शनाला आणून दिले. नरोटे यांनी गुडेवार यांनी अशा प्रकारचे काम करून महापालिकेत प्रायव्हेट फॅक्टरी स्थापन करण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला. विरोधी पक्षाचे सदस्य अशोक निंबर्गी, सुरेश पाटील, आनंद चंदनशिवे यांनी तांत्रिक कारणावरून आयुक्तांनी आपल्या अधिकाराचा वापर करून या नियुक्त्या केल्या आहेत. प्रशासनाने याचा खुलासा करावा अशी उपसूचना मांडली. सहायक आयुक्त पंकज जावळे यांनी आयुक्तांनी अधिकाराचा वापर करून नियुक्त्या दिल्याचे स्पष्ट केले. पण कोठे, नरोटे यांनी नियुक्त्या बेकायदेशीर आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे असा मुद्दा उचलून धरला. महापौरांनी बहुमताने हा विषय दुरुस्तीसह चौकशीला पाठविण्यास मंजुरी दिली.राजकुमार हंचाटे, अनिल पल्ली यांच्या शाळांना घरगुती दराने करआकारणी करावी प्रस्तावावर गरमागरम चर्चा झाली. अशोक निंबर्गी यांनी डोनेशन घेऊन प्रवेश देणाऱ्या शाळांना पण या सवलतीचा लाभ देणार का असा सवाल उपस्थित केला. संजय कोळी, सुरेश पाटील, मोहिनी पतकी यांनीही हा मुद्दा उचलून धरला. मनोहर सपाटे यांनी शाळांचा हा ज्वलंत प्रश्न असल्याचे सांगितले. पण शाळांमधील फरक कोणी करायचा या सपाटेंच्या विधानावर वादळी चर्चा झाली. --------------------------सेवानिवृत्तांना पुनर्नियुक्ती देता येत नाही. उच्च न्यायालयाने याला बंदी घातली आहे. शासनाने प्रत्येक खातेप्रमुखास असे आदेश काढले आहेत. असे असताना अनेक विभागात अशा नियुक्त्या करण्यात आल्या. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.-महेश कोठेसभागृह नेते-------------------------सुडाचे राजकारण म्हणून सत्ताधारांनी आयुक्त गुडेवार यांना दोनवेळा लक्ष्य केले आहे. महापालिकेत कित्येक विभागात जागा रिक्त आहेत. अशात कामकाज चालवायचे कसे. अधिकाराचा वापर करून आयुक्तांनी दिलेल्या कंत्राटी नियुक्त्या कायदेशीर आहेत.-आनंद चंदनशिवेनगरसेवक