सोलापूरात अवयवदानासाठी ग्रीन कॉरीडॉर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 04:27 PM2018-07-24T16:27:03+5:302018-07-24T16:27:10+5:30

सुनील क्षीरसागर यांच्याही डोळे, किडनी आणि यकृत या अवयव दानासाठी अश्विनी हॉस्पिटल येथे ग्रीन कॉरीडॉरची व्यवस्था करण्यात आली. 

Green Corridor for Organ donation In Solapur | सोलापूरात अवयवदानासाठी ग्रीन कॉरीडॉर 

सोलापूरात अवयवदानासाठी ग्रीन कॉरीडॉर 

Next

 सोलापूर - सुनील क्षीरसागर यांच्याही डोळे, किडनी आणि यकृत या अवयव दानासाठी अश्विनी हॉस्पिटल येथे ग्रीन कॉरीडॉरची व्यवस्था करण्यात आली. 

मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांचे स्वीय सहायक सुनील क्षीरसागर यांचे अपघात झाल्याने त्यांचे ब्रेन डेड होऊन त्यांना अश्विनी हॉस्पिटलमध्ये कृत्रिम यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. याबाबत त्यांच्या कुटूंबियांना सविस्तर माहिती दिल्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी सुनिल क्षीरसागर यांच्या अवयव दानास परवानगी दिल्याने त्यांचे दोन डोळे तोष्णीवाल तर एक किडनी आणि यकृत पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात पाठविण्यासाठी गिन कॉरीडॉरची व्यवस्था करण्यात आली.

दुसरी किडनी प्रत्यारोपणासाठी शासकीय यादीतील प्रतिक्षेत असलेल्या मुलीला अश्विनीमध्येच बसविण्यात आले आहे.  सुनील क्षीरसागर यांच्या पार्थिवावर आज ५ वा. मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

Web Title: Green Corridor for Organ donation In Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.