शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
2
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
3
“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल
4
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
5
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
6
Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
7
Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत
8
"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
9
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
10
Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 
11
...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण
12
"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण
13
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
14
Aadhar Card : १४ जूननंतर जुने आधार कार्ड खरोखरच निरुपयोगी होईल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
15
Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
16
राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी
17
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
18
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
19
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
20
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

शासनाचे आदेश; सोलापुरातील संभाजी तलावाच्या संवर्धनासाठी ३ कोटी ६६ लाख रुपयाचा निधी मंजूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 2:40 PM

सोलापूर : महापालिकेच्या धर्मवीर छत्रपती संभाजी तलावाच्या संवर्धनासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या १२ कोटी २१ लाख १३ हजार रुपयांपैकी ...

ठळक मुद्दे राज्य शासनाचे आदेश : लवकरच निधी खात्यावर वर्ग होणार३ कोटी ६६ लाख ३३ हजार ९०० रुपयांचे महापालिकेच्या खात्यावर वर्ग करण्यास राज्य शासनाने मंजुरी सरोवर योजनेतून संभाजी तलावाचे रुपडे बदलणार

सोलापूर : महापालिकेच्या धर्मवीर छत्रपती संभाजी तलावाच्या संवर्धनासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या १२ कोटी २१ लाख १३ हजार रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून ३ कोटी ६६ लाख ३३ हजार ९०० रुपयांचे महापालिकेच्या खात्यावर वर्ग करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले. 

केंद्राच्या सरोवर संवर्धन योजनेंतर्गत संभाजी तलावातील गाळ शास्त्रीय पद्धतीने काढून तलाव परिसराचे शुशोभीकरण करण्यात येणार आहे. या कामाच्या निविदा प्रक्रिया मनपाने काढल्या आहेत. गाळ काढण्याच्या कामासंदर्भातील निविदा निरी संस्था काढणार आहे. या योजनेत केंद्र शासनाकडून ७ कोटी ३२ लाख ६८ हजार ८०० रुपये मिळणार आहेत. महापालिकेचा हिस्सा ४ कोटी ८८ लाख ४५ हजार २०० रुपये असणार आहे. पर्यावरण विभागाने गुरुवारी याबाबतचे आदेश काढले. यातील शासनाचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. 

जिल्हा कोषागार कार्यालयात हा निधी पोहोचल्यानंतर तो तत्काळ महापालिकेला अदा करण्यात यावा, असेही या आदेशात म्हटले आहे. स्मार्ट सिटी योजनेतून सिद्धेश्वर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम होणार आहे. सरोवर योजनेतून संभाजी तलावाचे रुपडे बदलणार आहे. 

ही कामे होणार - संभाजी तलावाच्या सुशोभीकरणासाठी तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी आराखडा तयार करून घेतला होता. यात तलावातील प्रदूषण भारांचे नियंत्रण करण्यात येईल. त्यासाठी सांडपाणी प्रक्रिया उभारण्यात येईल. जलपर्णी वाढीसाठी पोषक असलेले घटक कमी करणे,  पाणथळ जागांची पद्धत निर्माण करणे, पावसाळी पाण्याचा निचरा करणे, जाळी लावणे, बांध मजबुतीकरण, सरोवर कुंपण, तटरेखा विकास आदी कामे करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूरgovernment schemeसरकारी योजनाwater shortageपाणीटंचाईSmart Cityस्मार्ट सिटीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका