शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

"रात गेली हिशेबात, पोरगं नाही नशिबात"; शरद पवारांवर गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 17:12 IST

Gopichand Padalkar on Sharad Pawar : त्यांचे या राज्यात तीन चारच खासदार आहेत. साडेतीन जिल्ह्यांच्या बाहेर त्यांचा पक्ष नाही. दिल्लीतील राजकारण मला कळत नाही. मात्र, असे असताना, कोंबड्याला काय वाटते, की मी ओरडल्याशिवाय, मी आरवल्याशिवाय उजाडतच नाही, असे काही कोंबडे दिल्लीत एकत्र आले होते.

सोलापूर - भाजपचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला. पवारांच्या दिल्ली बैठकांवरून त्यांनी पवारांवर जहरी टीका काली आहे. पवार हे गेल्या 30 वर्षांपासूनचे भावी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या भावी पंतप्रधान पदासाठी माझ्या शुभेच्छा. दिल्लीतील राजकारण मला कळत नाही. पण काही कोंबडे दिल्लीत एकत्र आले होते. मात्र, 'रात्र गेली हिशेबात पोरगं नाही नशीबात, अशी यांची परिस्थिती झाली आहे, असे पडळकर यांनी म्हटले आहे. ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी तिसऱ्या आघाडीवरुन पवारांवर, अशा शब्दात टीका केली आहे. (Gopichand Padalkar venomous criticism of Pawar in solapur Compared with the hen)

पडळकर म्हणाले, "मी लहाण असल्यापासूनच शरदचंद्र पवार हे गेल्या 30 वर्षांपासूनचे भावी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या पुढच्या 30 वर्षांच्या भावी पंतप्रधान पदासाठी माझ्या शुभेच्छा आहेत'. पण त्यांचे या राज्यात तीन चारच खासदार आहेत. साडेतीन जिल्ह्यांच्या बाहेर त्यांचा पक्ष नाही. दिल्लीतील राजकारण मला कळत नाही. मात्र, असे असताना, कोंबड्याला काय वाटते, की मी ओरडल्याशिवाय, मी आरवल्याशिवाय उजाडतच नाही, असे काही कोंबडे दिल्लीत एकत्र आले होते. त्यांनी अनेक बैठका घेतल्या. पण, 'रात गेली हिशेबात पोरगं नाही नशीबात, अशी परिस्थिती या लोकांची आहे. त्यामुळे त्यांनी असाच दबा धरून बसावं. पुढच्या लवनात कधी तरी यांना ससा सापडेल, कधी तरी त्यांनी टपून बसावं, याबद्दल माझी काही हरकत नाही," अशा शब्दात पडळकर यांनी शरदपवारांना टोले लगावले.

शरद पवारांना मोठा नेता मानत नाही आणि तुम्ही... -शरद पवार हे साडे तीन जिल्ह्यांचे स्वीमी आहे. त्यांचे तीन खासदार आहेत. त्यांना मोठं कोण मणणार? तुम्ही कुणी मानत असाल तर त्याच्याशी मला देणे-घेणे नाही. मी त्यांना मोठा नेता मानत नाही. मी शरद पवार आणि अजित पवारांशी मुद्द्यांवर बोलतो. त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या घरच्यांनी मुद्द्यांवर उत्तर द्यावं, ही विचारांची देवाण घेवाण आहे. असा टोलाही पडळकर यांनी पवारांना लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा डीएनए बहुजन विरोधी -ओबीसी मुद्द्यावर बोलताना पडळकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींसंदर्भात राज्य सरकारला डेटा सादर करायला सांगितले होते, पण त्यांनी ते केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा डीएनए बहुजन समाजाच्या विरोधातील आहेत. यामुळेच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने विरोधी याचिका दाखल केली, असेही पडळकर म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारGopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाSolapurसोलापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस