Good News; सोलापूर-मुंबई विमानसेवेचे तिकीट बुकिंग झालं सुरू; स्टार एअर कंपनी येणार सेवा
By आप्पासाहेब पाटील | Updated: September 27, 2025 19:03 IST2025-09-27T19:03:07+5:302025-09-27T19:03:29+5:30
या बुकिंगला पहिल्याच दिवशी सोलापूरकरांनी मोठा प्रतिसाद प्रतिसाद दिला.

Good News; सोलापूर-मुंबई विमानसेवेचे तिकीट बुकिंग झालं सुरू; स्टार एअर कंपनी येणार सेवा
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: आजपासून स्टार एअर या विमान कंपनीच्या सोलापूर- मुंबई सोलापूर विमानसेवेचे १५ ऑक्टोबर पासून बुकिंग सुरू झाले आहे. या बुकिंगला पहिल्याच दिवशी सोलापूरकरांनी मोठा प्रतिसाद प्रतिसाद दिला.
दरम्यान, विमान प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबरपासून दर मंगळवार, बुधवार, शुक्रवार व शनिवारी दुपारी विमानसेवेची सुरुवात होत आहे.
मुंबईहून दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी निघालेले विमान सोलापुरात दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल व तेच विमान दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी सोलापूरहून मुंबईसाठी निघून मुंबईत दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचणार आहे.
सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू होत असल्याने खऱ्या अर्थाने सोलापूरच्या विकासास आता चालना मिळाली आहे. आता सोलापूरला नवे उद्योग येतील, लोकांच्या हाताला काम मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.