शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

चांगली बातमी; शेजारच्या जिल्ह्यांपेक्षा सोलापुरातील कोरोना मृत्यूदराचा वेग खूप कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 12:32 PM

कोरोनाबाधितमध्ये पुणे अव्वल: उशिरा सुरुवात होऊन कोल्हापूरने टाकले मागे

ठळक मुद्देसोलापूर शहर आणि जिल्ह्यात २ सप्टेंबरपर्यंत १ लाख ६० हजार ४२१ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या कोरोनाच्या सुरुवातीला म्हणजे मे महिन्यात शहरात ८८, जूनमध्ये १६६ आणि जुलैमध्ये ११४ मृत्यू झाले होतेकोरोना टेस्ट, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंटवर भर दिल्याने ही स्थिती दिसत असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे

सोलापूर : कोरोनाचा मृत्यूदर वाढल्याने दोन महिन्यांपूर्वी देशात अव्वल ठरलेल्या सोलापूरचे नाव आता मागे पडले आहे. पुणे विभागात आता पुणे व  त्यानंतर कोल्हापूरला रुग्ण वाढले आहेत. 

जून आणि जुलै महिन्यात सोलापूर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. कोरोनाने मृत्यू होण्याचेही प्रमाण अधिक होते. पण लॉकडाऊननंतर पुणे विभाग व मराठवाडा, विदर्भातील  जिल्ह्याने सोलापूरला मागे टाकल्याचे दिसून येत आहे. सोलापुरात कोरोना रुग्ण आढळून येण्यास सुरुवात लवकर झाली. त्यामुळे मृत्यू वाढल्याने सोलापूरचे नाव देशपातळीवर गेले होते. कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना केल्यावर संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. 

कोरोना टेस्ट, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंटवर भर दिल्याने ही स्थिती दिसत असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. २ आॅगस्ट ते २ सप्टेंंबर या कालावधीत पुणे विभाग, मुंबई व मराठवाड्यातील शहरांची स्थिती पाहिली तर सोलापूर आता कोरोना संसर्गात मागे पडले आहे. पुणे, कोल्हापूर हे विभागात आघाडीवर आहेत. 

एका महिन्यात पुणे विभागातील रुग्णांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. सोलापूर शहर: १ हजार ७०७ (मृत्यू: ५६), ग्रामीण: ८ हजार ४०३ (२३६),  पुणे शहर: ४४ हजार ५५५ (१२५), पुणे ग्रामीण: १७ हजार ८२६ (४३८), सातारा जिल्हा: ११ हजार ३५१ (२१९), कोल्हापूर शहर: ६ हजार १०१ (१५८), सांगली/मिरज: ६ हजार ९७७ (२२६), सांगली ग्रामीण: ५ हजार ६२४ (१६३), उस्मानाबाद जिल्हा: ५ हजार ३४९ (१२०), लातूर शहर: २ हजार ६६४ (७८), लातूर ग्रामीण: ३ हजार ६६५ (१०९) बीड: ४ हजार २०७ (१०५).

सोलापुरात चाचण्या वाढल्यासोलापूर शहर आणि जिल्ह्यात २ सप्टेंबरपर्यंत १ लाख ६० हजार ४२१ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १८ हजार ९७२ जण पॉझिटिव्ह आढळले होते. यातील १४ हजार २४२ जण उपचारानंतर  कोरोनामुक्त झाले आहेत. या कालावधीपर्यंत ७६४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या सुरुवातीला म्हणजे मे महिन्यात शहरात ८८, जूनमध्ये १६६ आणि जुलैमध्ये ११४ मृत्यू झाले होते. बळींचा आकडा वाढल्याने चिंता व्यक्त होत होती. त्यानंतर चाचण्या व उपचार पद्धतीत सुधारणा केल्यावर मृत्यूचे प्रमाण घटले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे