शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
3
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
4
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
5
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
6
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
7
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
8
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
9
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
10
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
11
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
12
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
13
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
14
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
15
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
16
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
17
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
18
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

Good News; सोलापूर शहरातील प्रदूषणात सरासरी पेक्षा ७० टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 10:45 AM

लॉकडाऊन इफेक्ट; एयर क्वालिटी इंडेक्सही सुधारला

ठळक मुद्देरस्त्यावर वाहने नसल्याने ध्वनिप्रदूषण ही आटोक्यातलॉक डाऊनमुळे शहरातील वातावरण अधिक स्वच्छसोलापूर शहरातील प्रदुषणात 70 टक्के घट

शितलकुमार कांबळे

सोलापूर : लॉकडाऊनमुळे शहराचा वेग मंदावला असला तरी शहरांमधली हवेची गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. एरव्ही मध्यम असणारा एअर क्वॉलिटी इंडेक्स समाधानकारक आणि उत्तम असल्याची सध्या नोंद होत आहे. शहरातील प्रदूषणात सरासरी ७० टक्के घट झाल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमुख प्रशांत भोसले यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.प्रदूषण विभागामार्फत केलेल्या या सर्वेक्षणात नायट्रोजन आॅक्साइड व धुलीकणांचे प्रमाण हे कमी झाल्याचे आढळून आले आहे.  महापालिका, सात रस्ता, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील हवा गुणवत्ता नेहमीपेक्षा शुद्ध असल्याचे त्या ठिकाणी असलेल्या प्रदूषण मापन केंद्रावरील माहीतीवरुन स्पष्ट होत आहे. कोरोनाच्या पाशर््वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था जवळपास थांबली आहे. तसेच फेरीवाले लोंकांची वर्दळ यातही घट झाल्याने हा फरक पडला आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी अगोदर जमावबंदी व आता १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. यामुळे सर्व प्रकारची सार्वजनिक आणि खासगी वाहतूक बंद करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही ठप्प आहे. परिणामी, रस्त्यांवर प्रचंड शुकशुकाट असून एखाद-दोन वाहनेच दृष्टीस पडत आहेत. यामुळे शहरातील वायूप्रदूषणाची पातळी झपाट्याने कमी झाली आहे. कोरोनामुळे सर्व नागरिक घरातच असल्याने कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी मदत होत असताना दुसरीकडे काही दिवसांकरिता तरी प्रदूषण कमी झाल्याचे चित्र आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे लोक घरीच आहेत. अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कमी आहे. अनेक कंपन्या बंद असल्याने कच्च्या मालाच्या होणाºया पुरवठ्यासाठीची वाहतूकही बंद आहे. वाहतूक बंद असल्याने गाड्यांचा धूर, धुळही कमी झाला आहे.-------सोलापूर हिरव्या रंगाच्या गटातप्रदूषण विभागामार्फत हवेतील दर्जा तपासण्याबाबत चार गट केलेले आहेत. यात हिरवा, पिवळा, नारंगी आणि लाल या रंगाचा समावेश आहे. त्यात हिरवा रंग अति शुद्ध हवा म्हणून नोंद होते. तर पिवळ्या रंगात मध्यम शुद्ध, नारंगी रंगात प्रदूषित, तर लाल रंग असलेला परिसर अति प्रदूषित गटात मोडतो. मागील वर्षी एप्रिल महिन्यात सोलापूर शहर पिवळ््या रंगात मोडत होते. सध्या सोलापूर शहर परिसर हा हिरव्या रंगाच्या गटात मोडत आहे. त्यामुळे शहरातील प्रदुषणात घट झाल्याचे दिसून येत आहे.-------- 

लॉकडाऊनमुळे शहारील हवा शुद्ध झाली आहे. कार्बन डायआॅक्साईड, सल्फर डाय आॅक्साईड या घातक वायूंचे प्रमाण कमी झाल्याने वातावरण स्वच्छ झाले असून हवेतील आॅक्सिजनचे प्रमाण वाढले आहे. वाहनेच रस्त्यांवरून धावत नसल्याने ध्वनिप्रदूषणालाही आळा बसला आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. सरासरी शहराचे प्रदूषण ७० टक्क्यांनी कमी झाले आहे.- प्रशांत भोसले, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषण