शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Good News; पार्सल वाहतुकीतून मध्य रेल्वेला मिळाले साडेतीन कोटींचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 11:30 AM

लॉकडाऊन काळातही फायदा; ११५२ टन औषधांसह जीवनावश्यक औषधांचा पुरवठा

ठळक मुद्देलॉकडाऊन कालावधी वाढविल्यानंतर मध्य रेल्वेने पुढील पार्सल रेल्वे गाड्यांची वाहतूक ३० जून अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला ००११३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-शालिमार ही ३० जूनपर्यंत तर ००११४ शालिमार- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पार्सल ट्रेन २ जुलैपर्यंत नियमित धावणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चेन्नई सेंट्रल पार्सल रेल्वे गाडी खालील वेळेनुसार वाडी - सिकंदराबाद - विजयवाडामार्गे चालविण्यात येतील.

सुजल पाटील

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक साहित्याच्या माध्यमातून मध्य रेल्वेने माल वाहतुकीच्या माध्यमातून ३.६४ कोटींचे उत्पन्न मिळवले. ११५२ टन औषधांसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून कोरोना वॉरियर्स म्हणून अधिकारी, चालक व अन्य टीमने आपले योगदान दिल्याचे वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी सांगितले.

 भारतात कोविड-१९ या देशभर पसरलेला साथीचा आजार रोखण्यासाठी सर्व नियमित प्रवासी रेल्वे सेवा रद्द केल्या आहेत. तथापि, विशेष गाड्या चालविण्याव्यतिरिक्त देशभरातील जीवनावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी कायम राखण्यासाठी मालगाड्या (फ्रेट) आणि पार्सल गाड्या धावत आहेत. दरम्यान ५ जून २०२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, कल्याण, नागपूर, भुसावळ, सोलापूर, पुणे आणि नाशिक ते नागपूर, सिकंदराबाद, चेन्नई आणि शालिमार येथे जाण्यासाठी विविध ठिकाणी ९७५५ टन जीवनावश्यक वस्तू पार्सल गाड्यांमधून पाठविल्या आहेत. लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात आल्यामुळे गरज लक्षात घेता शालिमार व चेन्नईसाठी पार्सल गाड्या ३० जूनपर्यंत चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

हा माल पाठविला पार्सल गाडीद्वारे...- या लॉकडाऊन कालावधीत मध्य रेल्वेने पुरवठा साखळी कायम राखण्यासाठी ३३३६ टन खाद्यपदार्थ / पेरीशेबल आणि ५०८० टन हार्ड पार्सलची वाहतूक केली आहे. या साथीच्या आजारात औषधे/फार्मा उत्पादनांचा पुरवठा करणे हे देखील एक आव्हानात्मक काम होते. या लॉकडाऊन कालावधीत मध्य रेल्वेने ११५२ टन औषधे / फार्मा उत्पादनांची वाहतूक केली आहे. या विशेष पार्सल गाड्यांद्वारे झालेल्या वाहतुकीत ९७ टन पोस्टल / आरएमएस बॅग आणि ८९ टन ई-कॉमर्स उत्पादनांचा समावेश आहे. 

लॉकडाऊन कालावधी वाढविल्यानंतर मध्य रेल्वेने पुढील पार्सल रेल्वे गाड्यांची वाहतूक ३० जून अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ००११३ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-शालिमार ही ३० जूनपर्यंत तर ००११४ शालिमार- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पार्सल ट्रेन २ जुलैपर्यंत नियमित धावणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चेन्नई सेंट्रल पार्सल रेल्वे गाडी खालील वेळेनुसार वाडी - सिकंदराबाद - विजयवाडामार्गे चालविण्यात येतील. ००११५ व ००११६ या पार्सल गाड्या दोन्ही दिशेने लोणावळा, पुणे, सोलापूर, वाडी, सिकंदराबाद, विजयवाडा येथे थांबतील.- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, मध्य रेल्वे, सोलापूर विभाग.  

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस