शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

Good News; सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी केंद्राकडून ३२४ कोटींचा निधी मंजूर

By appasaheb.patil | Updated: April 5, 2021 13:24 IST

नितीन गडकरींची माहिती- शहरातील जमखंडी पुलाच्या कामाचाही समावेश

अप्पासाहेब पाटील

सोलापूर - मोहोळ-कामती, कणबस-तांदुळवाडी, टेंभुर्णी-पंढरपूरसह अन्य तीन ते चार रस्ते विकास कामांना केंद्राने मंजुरी दिली आहे. यासाठी ३२३ कोटी ८१ लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी प्रगती का हायवे हा हॅशटॅग वापरून रविवारी दिली.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय, तसेच राज्य महामार्गांच्या कामासंदर्भात मोठी घोषणा केली होती. राज्यभरातील वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधींचा निधी जाहीर करण्यात आल्याचे गडकरी यांनी ट्विटरवरून सांगितलं होते. मात्र, त्यावेळी सोलापुरातील रस्ते कामांचा समावेश नव्हता. दरम्यान, रविवारी गडकरी यांनी ट्वीट करून सोलापूर जिल्ह्यातील मंजूर रस्ते कामांसह मंजूर निधीची माहिती दिली आहे. यामध्ये खास करून अन्य राज्यांना जोडणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश असल्याचे चित्र दिसत आहे.

ही आहेत सोलापूर जिल्ह्यातील मंजूर कामे...

 

  • - टेंभुर्णी-पंढरपूर-मंगळवेढा-उमदी ते कर्नाटक सीमा (विजापूर) मार्गाचे मजबुतीकरण- ७० कोटी ६७ लाख
  •  
  • - टेंभुर्णी-कुसळंब विभागातील सध्याच्या कॅरेजवेचे मजबुतीकरण व रुंदीकरण - १५७ कोटी ७२ लाख
  •  
  • - सोलापूर-हैदराबाद मार्गावरील सोलापूर शहराजवळ असलेल्या जमखंडी पुलाच्या कामासाठी - २ कोटी ८३ लाख
  •  
  • -सोलापूर-विजापूर महामार्गावरील पुलाच्या कामांसाठी - ३ काेटी ९८ लाख
  •  
  • -पाटस-बारामती-इंदापूर-अकलूज-सांगाेला-जत विभागातील रस्ते कामांचे मजबुतीकरण - १० कोटी ३७ लाख
  •  
  • - कुसळंब-येडशी विभागातील बार्शी-येडशी-मुरूड-लातूर-रेणापूर-उदगीर-देगलूर-सरगोली या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी - ४९ काेटी १२ लाख
  •  
  • -सोलापूर-विजापूर महामार्गावरील दुहेरीकरणाच्या चौपदरीकरणातील अन्य कामासाठी - २९ कोटी १२ लाख

 

सोलापूर जिल्ह्यात रस्ते कामांचे जाळे विस्तारले...

मागील काही वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील रस्त्याचे जाळे चांगलेच पसरले आहे. सोलापूर-पुणे, सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-विजापूर, सोलापूर-तुळजापूर, सोलापूर-अक्कलकाेट, सोलापूरमार्गे जाणारा रत्नागिरी -नागपूर आदी विविध रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. काही मार्गाचे मजबुतीकरण व विस्तारीकरणही झाले आहे. याचपैकी काही रस्त्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरroad transportरस्ते वाहतूकNitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्ग