सोलापुरातील तीन घरात झाला गॅसचा स्फोट; घरगुती साहित्य जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 14:01 IST2019-08-28T13:58:48+5:302019-08-28T14:01:09+5:30
जिवितहानी नाही; आर्थिक नुकसान मोठया प्रमाणात, जीवनाश्यक वस्तू जळून खाक

सोलापुरातील तीन घरात झाला गॅसचा स्फोट; घरगुती साहित्य जळून खाक
सोलापूर : सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक दोन येथील आदर्श नगर भागात बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास तीन घरात गॅसचा स्फोट झाला. या स्फोटात जिवितहानी झाली नसून आर्थिक नुकसान मोठया प्रमाणात झाले आहे. शिवाय तिन्ही घरातील जीवनाश्यक वस्तु जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
सोलापूर शहरात असलेल्या प्रभाग क्रमांक दोन येथील आदर्श नगरात राहणाºया गोविंद चकले याच्या घरात प्रथम स्फोट झाला. त्यानंतर वंदना पंधारकर व मोहम्मद पटेल अशा एकापाठोपाठ एक तीन टाक्यांचा स्फोट झाला़ या स्फोटामुळे आदर्श नगरात धुराचे लोळ पसरले़ नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची माहिती शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली़ स्फोटामुळे लागलेली आग विझविण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्याअग्शिनशामक दलाच्या पथकाने धाव घेत आग आटोक्यात आणली. सोलापूर महानगरपालिका अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी घटनास्थळाची पाहणी केली़ यावेळी महापालिकेचे अन्य अधिकारी व प्रभागातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.