शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

ई-लर्निंगसोबत शिक्षकांनी बनविलेल्या व्हिडिओतून आनंददायी शिक्षणाची गंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 2:56 PM

माझी उपक्रमशील शाळा... शिक्षणाचा सोलापुरी पॅटर्न; श्री सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळेचे विद्यार्थी स्वत: तयार करतात शिक्षणपूरक साहित्य

ठळक मुद्देई-लर्निंगला इंटरनेटची जोड दिल्यामुळे कोणतीही माहिती विद्यार्थ्यांना तत्काळ उपलब्ध होतेशाळेच्या शिक्षकांनी तयार केलेल्या व्हिडिओ, फोटोचा वापर करून अध्ययन, अध्यापन प्रभावी केले जातेसाहित्य स्वत:च बनविल्यामुळे एखादी संकल्पना समजण्यास त्यांच्या मनावर ठसवण्यास मदत

सोलापूर : आजच्या आधुनिक युगात शिक्षण हे एकतर्फी न राहता व्यापक बनावे. ते चार भिंतीत न राहता विद्यार्थ्यांना प्राप्त करत असलेल्या ज्ञानाचे मूर्त स्वरूप जाणून घ्यावे, यासाठी शाळेमध्ये ई-लर्निंगचा वापर करण्यात येतो. आपली ज्ञानेंद्रिये ही ज्ञानाची प्रवेशद्वारे आहेत. शैक्षणिक साधनांचा वापर करून अध्ययन, अनुभव मूर्त अधिक वास्तव असून, त्यामुळे कठीण संकल्पना स्पष्ट करणे, सहसंबंध दाखवणे, रसग्रहण करणे निरीक्षण करणे अधिक सोपे होते. 

ई-लर्निंगला इंटरनेटची जोड दिल्यामुळे कोणतीही माहिती विद्यार्थ्यांना तत्काळ उपलब्ध होते. विद्यार्थी हे वेगाने व जास्त ज्ञान प्राप्त करतात. तसेच शाळेच्या शिक्षकांनी तयार केलेल्या व्हिडिओ, फोटोचा वापर करून अध्ययन, अध्यापन प्रभावी केले जाते. विद्यार्थ्यांकडून अभ्यासक्रमपूरक साहित्य तयार करून घेतले जाते. साहित्य स्वत:च बनविल्यामुळे एखादी संकल्पना समजण्यास त्यांच्या मनावर ठसवण्यास मदत होते. यामुळे विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा आनंद होतो. 

नवनिर्मितीचा आनंद व अनुभव देण्यासाठी राखी, आकाशदिवा, भेटकार्ड, किल्ला, मातीच्या वस्तू, कागदकाम घेतले जाते. तसेच टाकाऊ पदार्थांपासून टिकाऊ वस्तू तयार करून घेतले जातात. अशा विविध उपक्रमांना मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक आप्पासाहेब हत्तुरे, अध्यक्ष कल्लप्पा माळी, सिद्धप्पा वरनाळ, सुधाकर कामशेट्टी यांचे मार्गदर्शन व सहकार्य असते.

विद्यार्थीच करतात नियोजन- महापुरुषांची जयंती, स्मृतिदिन आदी कार्यक्रम शाळेमधून नेहमी घेण्यात येतात. या कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांकडेच असते. त्यातून त्यांच्यात धीटपणा, कार्यक्रमाच्या तयारीची जाण या वयातच होण्यात मदत होते. या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने कार्यक्रमाची जबाबदारी दिली जाते. वाचन संस्कृती वाढावी म्हणून शाळेतील ग्रंथालयात सुमारे २ हजार ५०० पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याचा वापर विद्यार्थी करतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण तर होतेच तसेच ज्ञानवृद्धीही होते. विद्यार्थ्यांमध्ये सामान्यज्ञान वाढावे या दृष्टीने परिपाठावेळी दिनविशेष व व्यक्तिपरिचय दिला जातो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना दररोज एक सामान्यज्ञानाचा प्रश्न विचारला जातो. विद्यार्थी हे विविध माध्यमांचा वापर करून उत्तर शोधून आणतात. 

शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम वर्षभर घेतले जातात. यात गुणवत्ता विकास, स्पर्धा परीक्षांची ओळख, विविध स्पर्धा तसेच टॅलेंट सर्च ही परीक्षा घेतली जाते. पालकांची भूमिका महत्त्वाची असल्यामुळे त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी माहिती दिली जाते. यासाठी प्रत्येक वर्गाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सुरू करण्यात आला आहे. या ग्रुपवरच पालकांना सूचना तसेच घरचा अभ्यास याची माहिती दिली जाते. - सचिन जाधव, मुख्याध्यापक, श्री सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळा

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाEducationशिक्षणdigitalडिजिटल