गणपतआबांची प्रकृती स्थिर; कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 14:48 IST2021-07-28T14:46:10+5:302021-07-28T14:48:16+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकींग

Ganapat Aba's health is stable; Activists should not crowd - Jayant Patil | गणपतआबांची प्रकृती स्थिर; कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये - जयंत पाटील

गणपतआबांची प्रकृती स्थिर; कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये - जयंत पाटील

सोलापूर -  सांगोल्याचे माजी आमदार व शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू असून हातापायाची हालचाल सुरू आहे. गणपत आबा लवकर बरे होतील असा विश्वास व्यक्त करीत कार्यकर्त्यांनी हॉस्पीटल परिसरात गर्दी करू नये असे आवाहन शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केले आहे. 

शेकापचे आमदार जयंत पाटील हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी सोलापुरातील खासगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या गणपतआबांच्या तब्येची विचारपूस व पाहणी केली. उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व डॉक्टरांशी त्यांनी संवाद साधला. कालपासून गणपतराव देशमुखांची तब्येत चिंताजनक असल्याचे संदेश सोशल मिडियावर फिरत होते, त्यानंतर त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी तब्येत सुधारत असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. याबाबतची माहिती मिळताच शेकापचे आमदार जयंत पाटील गणपतरावांच्या तब्येतेची विचारपूस करण्यासाठी सोलापूर गाठले. 

गणपतराव देशमुखांची तब्येत बरी व्हावी यासाठी आज सकाळपासून सांगोल्यात कार्यकर्त्यांनी प्रार्थना करण्यास सुरूवात केली आहे. गणपतआबा लवकरच बरे होतील असा विश्वास सांगोल्यातील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. 

Web Title: Ganapat Aba's health is stable; Activists should not crowd - Jayant Patil