सोलापूरच्या माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांचा शिंदे सेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 22:43 IST2025-06-25T22:41:40+5:302025-06-25T22:43:34+5:30

विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाविरोधात काम केल्याने भाजपने त्यांची हकालपट्टी केली होती.

former solapur mayor shobhatai banshetti joins shiv sena shinde group | सोलापूरच्या माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांचा शिंदे सेनेत प्रवेश

सोलापूरच्या माजी महापौर शोभाताई बनशेट्टी यांचा शिंदे सेनेत प्रवेश

सोलापूर : सोलापूरच्या माजी महापौर शोभाताई बनशेट्टी आणि त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी यांचा आज एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश झाला.

यावेळी माजी महापौर यांना योग्य महाराष्ट्र राज्यस्तरीय जबाबदारी देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले. यावेळी माजी गृहराज्यमंत्री तथा शिवसेना नेते सिध्दाराम म्हेत्रे, सोलापूर लोकसभा महेश साठे, सोलापूर लोकसभा महिला आघाडी संपर्कप्रमुख अनिता माळगे, युवासेना राज्य कार्यकारणी सदस्य प्रियांका परांडे, योगेश माळगे उपस्थित होते. शोभाताई बनशेट्टी यांनी भाजपकडून सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. भाजपाने त्यांना महापौर पदावर काम करण्याची संधी दिली होती. विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाविरोधात काम केल्याने भाजपने त्यांची हकालपट्टी केली होती.

Web Title: former solapur mayor shobhatai banshetti joins shiv sena shinde group