माजी खासदार धनंजय महाडिक, जयकुमार गोरे आणि राणा जगजितसिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 20:29 IST2019-09-01T20:17:04+5:302019-09-01T20:29:38+5:30

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

Former MPs Dhananjay Mahadik, Jayakumar Gore and Rana Jagjit Singh join BJP | माजी खासदार धनंजय महाडिक, जयकुमार गोरे आणि राणा जगजितसिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

माजी खासदार धनंजय महाडिक, जयकुमार गोरे आणि राणा जगजितसिंह यांचा भाजपमध्ये प्रवेश

सोलापूर : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोप यात्रेवेळी कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भाजपाचा झेंडा दिला. याचबरोबर जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांचे नातेवाईक राणा जगजित सिंह यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. 


यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. विरोधकांची झोप उडवणारी महाजनादेश यात्रा आहे. पाच वर्षात काय केले याचा हिशोब देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढलेली आहे. आभार मानण्यासाठी, हिशोब देण्यासाठी, सूचना मागण्यासाठी ही यात्रा काढल्याचे पाटील यांनी सांगितले. आपल्या पक्षातील आमदार-खासदार हे भाजप-शिवसेनेचे जात असल्यामुळे शरद पवार यांचा त्रागा झाला त्यामुळेच पत्रकारांवर ते चिडले अशी टीका करताना पाटील यांनी उदयनराजे काय पोर आहेत का, असा सवालही केला. 

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे लवकरच करणार भाजप प्रवेश करतील. विरोधकांना नेहमीच जातीच राजकारण दिसतं, असेही पाटील यांनी सांगितले. 

Web Title: Former MPs Dhananjay Mahadik, Jayakumar Gore and Rana Jagjit Singh join BJP