सोलापूरचे माजी महापाैर महेश काेठे यांचे 'महाकुंभ'मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 10:32 IST2025-01-14T10:27:25+5:302025-01-14T10:32:20+5:30
प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्यात स्नान करताना आला हृदयविकाराचा झटका

सोलापूरचे माजी महापाैर महेश काेठे यांचे 'महाकुंभ'मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
साेलापूर: महापालिकेचे माजी महापाैर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहरातील नेते महेश विष्णूपंत काेठे (वय ६०) यांचे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. यामुळे शहरावर शाेककळा पसरली आहे.
महेश काेठे आणि त्यांचे काही मित्र कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेले हाेते. प्रयागराज येथे मंगळवारी सकाळी स्नान करीत असताना त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. यात त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. महेश काेठे यांच्या निधनाचे वृत्त येताच शहरावर शाेककळा पसरली. काेठे यांच्या मुरारजी पेठेतील घरासमाेर कार्यकर्त्यांची माेठी गर्दी झाली हाेती.
साेलापूर महापालिकेच्या राजकारणावर वर्चस्व असलेला नेता अशी महेश काेठे यांची ओळख हाेती. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले हाेते. विधानसभा निवडणुकीत त्यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली हाेती. शहराच्या राजकारणातील एक धुरंधर नेता हरपल्याची संवेदना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली.