ऑक्सिजन वाढविण्यासाठी वनविभागाने जगविली सव्वातीन लाख झाडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 02:23 PM2020-09-23T14:23:02+5:302020-09-23T14:25:19+5:30

रोजगार हमी योजनेंतर्गत कामे : चार वर्षात लावली ४ लाख ५० हजार ४८५ रोपं...

The forest department has saved a quarter of a million trees to increase oxygen | ऑक्सिजन वाढविण्यासाठी वनविभागाने जगविली सव्वातीन लाख झाडे 

ऑक्सिजन वाढविण्यासाठी वनविभागाने जगविली सव्वातीन लाख झाडे 

googlenewsNext
ठळक मुद्देनेहरु नगर ते वनविहार परिसरात रस्त्यांच्या कडेला आणि सिद्धेश्वर वनविहारात २०१९-२० या वर्षात विविध ४००० रोपं लावलीसिद्धेश्वर वनविहारात आंब्याची ४०० रोपं लावली आहेत़ ही रोपं पावसाच्या पाण्यावर आणि बोअरच्या पाण्यावर वाढत आहेत

सोलापूर : कोरोना काळात नैसर्गिक आणि कृत्रिम ऑक्सिजनची चर्चा घराघरात होतेय़ याचे महत्त्वही प्रत्येकाला कळून आले आहे. सोलापुरात नैसर्गिक ऑक्सिजन वाढविण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न झाले आहेत. २०१६ ते २०२० या चार वर्षांत रोजगार हमी योजनेंतर्गत विविध उपक्रमांतर्गत उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात ४ लाख ५०,४८५ रोपं लावली़ त्यांच्या प्रयत्नातून प्रत्यक्षात ३ लाख ९,२४५ रोपं जगली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी (रो़ह़यो़) चे इर्शाद शेख यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

पर्यावरण संतुलित हरित महाराष्ट्र करण्यासाठी दरवर्षी राज्यात राबविण्यात येणाºया वृक्ष लागवड अभियानाच्या निधीत यंदा कपात झाली आहे़ हरित महाराष्ट्र मोहिमेला बळ देण्यासाठी सामाजिक वनीकरण आणि वनविभाग हे दोन्ही विभाग विविध माध्यमातून धडपड करीत आहेत़ याही काळात रोपांच्या लागवडीवर भर दिला आहे.

मागील चार वर्षांत उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तीन तालुक्यात ऑक्सिजन वाढवणारी लिंब, सुबाभूळ, अंजन, खैरसह आवळा, सीताफळ आणि आंबा अशी फळ रोपं लावली आहेत. ही रोपं लावत असताना त्याचे नियोजनही केले. दक्षिण सोलापूर तालुक्यात गंगाधर कणबस, आचेगाव, हत्तूर, घोडातांडा, माळकवठे, हत्तरसंग, बोरामणी, सलगर, औज मंद्रुप, भंडारकवठे या गावांमध्ये तर उत्तर सोलापूर तालुक्यात वांगी, कौठाळी आणि सिद्धेश्वर वनविहारात रोपं लावली आहेत़ याशिवाय अक्कलकोट तालुक्यात दहिटणे, मैंदर्गी, कल्लप्पावाडी, सलगर, चुंगी, सातनदुधनी, मिरजगी, गळोरगी या गावांमध्ये वनविभागाच्या वतीने विविध रोपं लावण्यात आली आहेत़ 

वनविहारात लावली आंब्याची रोपं
नेहरु नगर ते वनविहार परिसरात रस्त्यांच्या कडेला आणि सिद्धेश्वर वनविहारात २०१९-२० या वर्षात विविध ४००० रोपं लावली़ या शिवाय सिद्धेश्वर वनविहारात आंब्याची ४०० रोपं लावली आहेत़ ही रोपं पावसाच्या पाण्यावर आणि बोअरच्या पाण्यावर वाढत आहेत़ 

सोलापुरात वृक्षलागवड वाढवून वनाधित क्षेत्र टिकवण्याचा प्रयत्न आहे़ वनपरिक्षेत्रात अनेक ठिकाणी मोकळ्या जागांवर रोपं लावली आहेत़ चार वर्षांत ४ लाख ५०, ४८५ रोपं लावली़ ती जगवण्यासाठी वनखात्याचा प्रयत्न झाला़ आता राहिलेल्या रोपांना पाण्याची कमतरता जाणवणार नाही यासाठी नियोजन करतोय़ 
- इर्शाद शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी (रो़ह़यो़), सोलापूर
 

Web Title: The forest department has saved a quarter of a million trees to increase oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.