धक्कादायक! पंढरपुरात प्रेम विवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीकडून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 13:19 IST2023-08-09T13:15:38+5:302023-08-09T13:19:58+5:30

पंढरपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Father who opposes love marriage beaten up by daughter in Pandharpur | धक्कादायक! पंढरपुरात प्रेम विवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीकडून मारहाण

धक्कादायक! पंढरपुरात प्रेम विवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीकडून मारहाण

पंढरपूर- प्रेम विवाहला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीनेच मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात घडली आहे. प्रियकराच्या मदतीने साक्षी शाह हिने वडील महेंद्र शहा यांना बेदम मारहाण केली आहे. 

"पप्पा, पोलिसात तक्रार करू नका, हे लोक मला मारून टाकतील"; लेकीने मृत्यूआधी सांगितलं दु:ख

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रेम विवाहाला परवानगी न दिल्यानं मारहाण केल्याचे समोर आले. मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास माढ्यातील प्रसिद्ध व्यापारी महेंद्र शहा हे शेटफळ येथून आपल्या मुलीला माढ्याकडे घेऊन येत होते. यावेळी वडाचीवाडी गावाजवळ बाथरुमसाठी गाडी थांबवली. यावेळी अज्ञातांनी शहा यांना जबर मारहाण सुरू केली. यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोलापुरातील रुग्णालयात दाखल केले. 

दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी साक्षी हिने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी यावेळी घटनेची चौकशी केली. पोलिसांनी संशयीतांना अटक केली. यावेळी पोलिसी खाक्या दाखवताच संपूर्ण कटाचा उलघडा झाला. 

प्रेम विवाहाला वडिलांचा विरोध होता त्यांना जायबंदी करून विवाह करण्याचा कट रचला आणि त्यानुसार हे कृत्य केले असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी साक्षी शहा,चैतन्य कांबळे,आतिश लंकेश्वर,रामा पवार,बंडू उर्फ आनंद जाधव ,मयूर चंदनशिवे असे अटक केलेले आरोपींची नाव आहेत.

Web Title: Father who opposes love marriage beaten up by daughter in Pandharpur