बाप रे; अभ्यासासाठी आईने रागाविल्याने १५ वर्षीय मुलगा गेला घर सोडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 21:35 IST2021-07-10T21:33:32+5:302021-07-10T21:35:03+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Father Ray; A 15-year-old boy left home to study | बाप रे; अभ्यासासाठी आईने रागाविल्याने १५ वर्षीय मुलगा गेला घर सोडून

बाप रे; अभ्यासासाठी आईने रागाविल्याने १५ वर्षीय मुलगा गेला घर सोडून

पंढरपूर : अभ्यास का करत नाही, तू अभ्यास कर असा दम आईने दिला म्हणून १५ वर्षीय मुलगा रोहित श्रीमंत कांबळे (वय १५, रा. सरकोली, ता.पंढरपूर) हा घर सोडून गेल्याची घटना सरकोली (ता. पंढरपूर) येथे रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली आहे. 


पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित श्रीमंत कांबळे याला त्याची आई जयश्री कांबळे या अभ्यास का करत नाही, तू अभ्यास कर म्हणून रागवल्या होत्या. याचा राग मनात धरुन कोणालाही काही न सांगता रोहित ४ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता घरातून निघून गेला आहे.

याबाबत मुलाचे वडील श्रीमंत नारायण कांबळे यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोना. ताटे करीत आहेत.

Web Title: Father Ray; A 15-year-old boy left home to study