ऊस बिल मिळत नसल्याने शेतकरी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 16:00 IST2019-07-30T15:55:26+5:302019-07-30T16:00:45+5:30
सिध्देश्वर साखर कारखानाविरोधात शेतकरी आक्रमक; आत्मदहन करण्याचा दिला इशारा

ऊस बिल मिळत नसल्याने शेतकरी संतप्त
ठळक मुद्दे- सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यांकडून शेतकºयांचे ऊस बिल देण्यास टाळाटाळ- संतप्त शेतकºयांनी घेतली जिल्हाधिकाºयांची भेट, सांगितल्या अडचणी- आम्हाला आत्महत्या करू द्या अशी विनवणी केली शेतकºयांनी निवेदनाव्दारे
सोलापूर : वारंवार मागणी करूनही ऊस बिल मिळत नसल्याने संतप्त शेतकºयांनी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ याचवेळी निवेदनात आम्हा शेतकºयांना आत्महत्येची परवानगी द्यावी असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
यावेळी सुरेश जगताप, महादेव साळुंखे, सय्यद शेख, सुभाष पाटील, धर्मराज साळुंखे, जगन्नाथ आमणे, कल्याण मगर, निर्मला पाटील, पोपट मगर, शेषा्राव गोरे, विठ्ठल गोरे, सविता पवार, मोहन माने, शाझाज माने, सुरेश माने, सुंदरराव गोरे, सुनिता गोरे आदी शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.