निर्यात केलेले सोलापुरी टॉवेल्स युद्धामुळे माघारी; तब्बल १५० कोटींचा फटका; निर्यात रकमेत ३० पट वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 12:50 IST2026-03-15T12:49:39+5:302026-03-15T12:50:39+5:30
मध्यपूर्व आशियातील देशांकडून अतिरिक्त सरचार्जेसबाबत येथील निर्यातदार व्यापाऱ्यांना संदेश येत आहेत. पूर्वी प्रतिकंटेनर सुमारे दीडशे डॉलर इतका खर्च येत होता. आता दुबईकडून वॉर सरचार्जेस लावण्यात आल्यामुळे खर्च ३ हजार डॉलरपर्यंत वाढला आहे.

निर्यात केलेले सोलापुरी टॉवेल्स युद्धामुळे माघारी; तब्बल १५० कोटींचा फटका; निर्यात रकमेत ३० पट वाढ
बाळकृष्ण दोड्डी -
सोलापूर : मध्यपूर्व आशियातील तणावामुळे सोलापुरातील टेक्स्टाइल व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. युद्धस्थितीमुळे इमर्जन्सी सरचार्जेस ३ ते ५ हजार डॉलरपर्यंत लागू झाल्यामुळे निर्यात प्रक्रिया महाग झाली आहे. काही कंटेनर समुद्रात अडकून पडले असून निर्यात झालेला सुमारे दीडशे कोटी रुपये किमतीचा टॉवेल्सचा माल परत मागविला आहे.
मध्यपूर्व आशियातील देशांकडून अतिरिक्त सरचार्जेसबाबत येथील निर्यातदार व्यापाऱ्यांना संदेश येत आहेत. पूर्वी प्रतिकंटेनर सुमारे दीडशे डॉलर इतका खर्च येत होता. आता दुबईकडून वॉर सरचार्जेस लावण्यात आल्यामुळे खर्च ३ हजार डॉलरपर्यंत वाढला आहे.
प्रतिकंटनेर खर्च तब्बल ५ हजार डॉलर्सच्या घरात
इराकसाठी पूर्वी प्रतिकंटेनर सुमारे ९०० डॉलर खर्च येत होता. आता तो ५ हजार डॉलरपर्यंत वाढला आहे. यामुळे निर्यात व्यवहार जवळपास ठप्प झाले असून, नवीन ऑर्डर्स पूर्णपणे बंद झाल्या आहेत.
आधी पाठवलेला माल परत मागविण्यासाठी निर्यातदारांकडून पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी दिली.