शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘हुतात्मा’च्या परिपूर्ण नूतनीकरणाची अपेक्षा

By admin | Updated: June 28, 2014 00:32 IST

बरीच कामे अपूर्ण : कलाकारांना नकोय उद्घाटनाची घाई

सोलापूर : हुतात्मा स्मृती मंदिरच्या नूतनीकरणाची रंगमंचावरील विंगा, मेकअप रूम, प्रांगणातील सुशोभीकरण आदी बरीच कामे अपूर्ण असताना उद्घाटनाची कोणतीही घाई करायला नको. महाराष्ट्रातील सर्वोत्तम असलेल्या या नाट्यगृहाचे नूतनीकरण परिपूर्ण व्हावे, अशी अपेक्षा कलाकार, रसिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.स्मृती मंदिराच्या नूतनीकरणाची प्रक्रिया गतवर्षी एप्रिल महिन्यापासून सुरू झाली असली तरी प्रत्यक्ष २४ जून २०१३ नंतर कामाला सुरुवात झाली. वर्ष उलटले तरी नूतनीकरणाचे काम पूर्ण न झाल्यामुळे काही कलाकारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यांच्याकडून तातडीने उद्घाटन करण्याची मागणी होत आहे. पण या मुद्द्यावर मतभिन्नता असून, संपूर्ण काम झाल्याशिवाय उद्घाटन करू नये, अशीही मते व्यक्त झाली.नाट्य व्यवस्थापक गुरू वठारे म्हणाले की, स्मृती मंदिरच्या नूतनीकरणासाठी २.५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पॉवर ग्रीडकडून उत्तमपणे काम सुरू आहे; पण निम्म्याहून अधिक कामे अपूर्ण आहेत. या स्थितीत उद्घाटनाची घाई केल्यास नंतर ही कामे होणार नाहीत. स्मृती मंदिरच्या मागील बाजूस कलावंतांच्या निवासासाठी खोल्या आहेत. त्यांचेही नूतनीकरण याच तरतुदीत होणार आहे. उद्घाटन झाल्यामुळे हेही काम अर्धवट राहील. त्यासाठी वेगळी आर्थिक तरतूद होणार नाही, अशीही भीती वठारे यांनी व्यक्त केली. नाट्य कलावंत अभय देशपांडे म्हणाले, महाविद्यालयीन जीवनात स्मृती मंदिरच्या रंगमंचावर काम करण्याची संधी मिळाली. नंतरच्या काळात पुणे, मुंबईच्या नाट्यगृहातही कामे केली; पण ‘हुतात्मा’ची सर अन्य कोणत्याही रंगमंचाला येत नाही. या नाट्यगृहाचे नूतनीकरण होतंय, ही आनंदाची बाब आहे. ते परिपूर्ण झाले पाहिजे. अभिनेते विक्रम गोखले आणि अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी हुतात्माच्या नूतनीकरणासंदर्भात ज्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या, त्यानुसार काम झाले पाहिजे. उद्घाटनाची कोणीही घाई करू नये, असे मला वाटते.कला रसिक प्रशांत बडवे यांनी ‘हुतात्मा’च्या नूतनीकरणासाठी दोन वर्षांपूर्वी एक चळवळ हाती घेतली होती. ज्येष्ठ कलावंतांच्या माध्यमातून सोलापूरच्या नेतृत्वापर्यंत हुतात्माच्या अवस्थेची माहिती पोहोचवली होती. त्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, सोलापूर महापालिकेने पुढाकार घेऊन पॉवर ग्रीडच्या माध्यमातून नूतनीकरणाचे काम सुरू केले. या कामाची मुदत संपली असली तरी आणखी मुदतवाढ देऊन काम पूर्ण करावे. ते परिपूर्ण असावे, अशी बडवे यांचीही अपेक्षा आहे.---------------------------------अपूर्ण कामे अशी...कुंजविहारींचे स्मारक, कर्टन, मेकअप रूममधील आरशे, रंगरंगोटी, फरशीकरण, पार्किंगचे काँक्रिटीकरण, साऊंड/लाईट/ एसी, रंगमंचावरील बांबू बदलणे, रंगमंचावरील झालर, रिंगा बदलणे, शंभर एक खुर्च्या लावणे, मुख्य ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती आदी.----------------------------------‘हुतात्मा’च्या अर्धवट कामांची मी यादीच तयार केली असून, ती कामे झाल्याशिवाय उद्घाटन सोहळा करू द्यायचा नाही, अशी माझी भूमिका आहे. सध्या काम अंतिम टप्प्यात आले असले तरी तांत्रिक कामे तशीच आहेत. उत्तम दर्जाचे नूतनीकरण झाल्यानंतरच उद्घाटन सोहळ्याचा घाट घालावा.- शिवानंद चलवादीसदस्य, सेन्सॉर बोर्ड