शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

मासे पकडायला गेलेल्या इंजिनिअर तरुण पाण्यात गेला वाहून; मंगळवेढ्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2020 9:44 PM

सेस्क्यु टीमला केले पाचारण; रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरू

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील ममदाबाद(हु )वरून शिरनांदगी तलावाकडे जाणाऱ्या ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे २५ वर्षीय उच्चशिक्षित तरुण इंजिनिअर  अनिल जगन्नाथ इंगोले वाहून गेल्याची घटना तालुक्यातील महमदाबाद हु येथे गुरुवारी सायंकाळी  घडली.

महिन्यांपासून सुरू असलेल्या म्हैसाळच्या पाण्याने या परिसरातील बंधारे  तुडुंब भरले असून अशा परिस्थितीत  गेल्या दोन दिवसांत जोरदार पाऊस झाल्यामुळे हे ओढे भरून वाहू भरून वाहू लागले आहे. या वाहत्या पाण्याचा अंदाज घेण्यासाठी हा तरुण सायंकाळी पाचच्या दरम्यान  पाण्यात मासे धरण्यासाठी गेला असता त्याला त्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो वाहून गेला. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली असून उपस्थित नातेवाईकांनी त्याचा आरडाओरड करून शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान या घटनेची माहिती पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. सायंकाळच्या दरम्यान शोध कार्य करण्यास अडथळा येत असल्यामुळे शोध कार्यासाठी रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती महमदाबादचे पोलिस पाटील राजाराम कटरे यांनी मंगळवेढा  पोलिसात दिली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

पंधरा दिवसात  तीन घटना; चार  जण मृत्युमुखी...सध्या बेसुमार पावसामुळे भीमा, माण नद्यासह  गावोगावच्या ओढे नाल्याने आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. नद्या पात्राबाहेर येऊन वाहत आहेत गत महिन्यात तळसंगी येथे शेततळ्यात पाणी वाढल्याने त्याचा अंदाज न आल्याने तीन बालकाचा मृत्यू झाल्याची घटना दि १७ सप्टेंबर  रोजी घडली त्यानंतर माण नदी ला पूर आल्याने मारापूर येथील सेवानिवृत्त लाईनमन बंधाऱ्यात वाहून गेल्याने दि  १९ सप्टेंबर रोजी ते मृत्युमुखी पडले. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून बेसुमार झालेल्या पावसाने महदाबाद ( हु) वरून शिरनांदगी तलावाकडे जाणाऱ्या ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे २५ वर्षीय उच्चशिक्षित तरुण अनिल जगन्नाथ इंगोले वाहून गेल्याची घटना गुरुवारी घडली या घटना पाहता नागरिकांनी या पूर परिस्थितीत मोठी काळजी घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरriverनदीwater shortageपाणीकपात