शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

अभियंत्यांची उत्कृष्ट बांधणी; उजनीची राज्यात सर्वाधिक साठवण क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 14:44 IST

अभियंता दिन विशेष; सोलापूरच्या सुपुत्रांनी सांभाळली संपूर्ण बांधकामाची धुरा

ठळक मुद्देउजनी धरण हे एक बहुउद्देशीय धरण असून सिंचनाबरोबरच अनेक गोष्टी यातून साध्य झाल्या आहेतजपान तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक असा १२ मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वितभीमा- सीना नदी जोड बोगदा खोदून सीना नदीत पाणी सोडून हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली

डी. एस. गायकवाड 

टेंभुर्णी : राज्यात सर्वात जास्त पाणी साठवण क्षमता असलेले उजनी गावच्या उजाड माळरानावर साकारलेले एक स्वप्न म्हणजे उजनी धरण होय. अभियंत्यांनी आपल्या कल्पनेतून साकारलेला उत्तम नमुना म्हणावा लागेल. धरणाच्या संपूर्ण बांधकामाची धुरा सांभाळलेले तत्कालीन अधीक्षक अभियंता हे सोलापूरचे सुपुत्र होते याचा अनेकांना विसर पडला असेल.

इंग्रजी सत्ता असताना उजनी धरणाचा एक वेळ सर्व्हे झाला होता. त्यानंतर स्वातंत्र्याच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सन १९६४ साली धरणाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता दिली. धरणाचे बांधकाम सलग ११ वर्षे चालले. या संपूर्ण बांधकामाची धुरा त्यावेळचे अधीक्षक अभियंता व सोलापूरचे सुपुत्र रस्ते यांच्यावर सोपवली होती. बांधकामास १९६९ साली प्रारंभ झाला व १९८० साली बांधकाम पूर्ण झाले. खरे अ‍ॅन्ड तारकुंडे कंपनीने बांधकाम केले. परंतु संपूर्ण बांधकामाची देखरेख रास्ते यांनी केली.प्रारंभी ४० कोटी खर्चास मंजुरी मिळालेल्या धरणाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत ९६.७७ कोटी खर्च झाला. २७ सप्टेंबर १९८० रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी उजनी धरणाचे लोकार्पण केले व १९८१ पासून धरणात पाणी साठवण्यास प्रारंभ झाला. 

आशिया खंडातील सर्वात लांब बोगदाउजनी धरण हे एक बहुउद्देशीय धरण असून सिंचनाबरोबरच अनेक गोष्टी यातून साध्य झाल्या आहेत. धरणाच्या पायथ्याशी जपान तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक असा १२ मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित आहे. तसेच १९ किलोमीटर लांबीचा भीमा- सीना नदी जोड बोगदा खोदून सीना नदीत पाणी सोडून हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली आहे. दोन नद्यांना जोडणारा आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा समजला जातो.

एक दृष्टिक्षेप१२३ टीएमसी प्रचंड  साठवण क्षमता असलेल्या धरणाच्या दगडी भिंतीची उंची ५६.४० चाळीस मीटर तर लांबी ९१४ मीटर आहे. मातीच्या भिंतीची उंची ३९.१० मीटर तर लांबी १६२६ मीटर आहे. धरणाची एकूण लांबी २५४० मीटर एवढी आहे. उजनी धरणास १२७६  मीटरचे एकूण ४१ दरवाजे आहेत तर ४ गार मोरी आहेत. उजनी धरणात १२६ किलोमीटर लांबीचा डावा  व ११२ किमी लांबीचा उजवा असे दोन कालवे आहेत. डाव्या कालव्याद्वारे १,३३,३३२ हेक्टर तर उजव्या कालव्याद्वारे ७१,९४५ हेक्टर एवढे क्षेत्र ओलिताखाली येत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीकपात