विजेचा शॉक लागून माय - लेकाचा मृत्यू; सोलापुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 14:42 IST2020-03-01T14:42:06+5:302020-03-01T14:42:46+5:30

रविवार पेठ येथील घटना : जेलरोड पोलीस ठाण्यात नोंद

Electric shock: Leica's death; Events in Solapur | विजेचा शॉक लागून माय - लेकाचा मृत्यू; सोलापुरातील घटना

विजेचा शॉक लागून माय - लेकाचा मृत्यू; सोलापुरातील घटना

सोलापूर : रविवार पेठ येथील फैजुलवारी मश्जिद वडार गल्ली येथील राहत्या घरा समोर लोखंडी तारेवरचे कपडे काढत असताना, तरूणाला विजेचा धक्का बसला. आई त्याला बाजुला काढण्यासाठी गेली असाता दोघांचाही मृत्यू झाला. हा दुर्देवी प्रकार रविवारी सकाळी ७.३0 वाजता घडला. 
अजय गणेश गंजी (वय २५), शशीकला गणेश गंजी (वय ५२) असे मरण पावलेल्या दोघां आई-मुलाची नावे आहेत. अजय गणेश गंजी हा सकाळी ६ वाजता झोपेतुन उठला. तो लवकर आंघोळ करून कामाला जाण्याच्या तयारीत होता. बाथरूमधुन बाहेर आल्यानंतर त्याने आंगणात असलेल्या तारेवरचे कपडे काढण्यासाठी गेला. तारेला हात लागताच विजेचा धक्का लागला व तो खाली पडला, मात्र त्याचा हात तारेमध्ये अडकला होता. 
आंगणात कपडे धुवत असलेल्या आईने हा प्रकार पाहिले. ती जागेवरून उठुन मुलाच्या दिशेने धावत आली. मुलाला तारेपासुन दुक करण्यासाठी बाजुला धरून ओढत असताना, तीलाही विजेचा धक्का बसला व तीही मुलाला चिटकली. हा प्रकार पाहुन वडील गणेश गंजी हे घरातुन बाहेर आले त्यांनाही विजेचा झटका बसला मात्र ते लगेच बाजुला सरकरले. लाकडाने दोघांना बाजुला काढले. दोघांना उपचारासाठी तत्काळ शासकीय रूग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषत केले. याची जेलरोड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Web Title: Electric shock: Leica's death; Events in Solapur