Pandharpur Crime: पंढरपुरात अनैतिक संबंधाची माहिती इतरांना सांगेल या भीतीने एका वृद्धाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. वयस्कर व्यक्तीच्या गळ्यावर, पोटावर, छातीवर चाकूने वार करून खून करण्यात आला. पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी येथे बुधवारी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. सूर्यकांत देवाप्पा रेवे (वय ६५, रा. सध्या ओझेवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे मृत्यू व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत कुमार दिगंबर जाधव (रा. ओझेवाडी, ता. पंढरपूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक माहिती अशी की, आपोचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे मयत सूर्यकांत रेवे यांना माहीत होते. ते इतर नातेवाइकांना सांगतील या भीतीने आरोपी याने सूर्यकांत रेवे यांच्या गळ्यावर, पोटावर, छातीवर चाकूने वार करून ठार मारले आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले व वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.