शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

स्मार्ट सिटीतून सोलापूरच्या परिवहनला मिळणार ‘ई-बस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 3:11 PM

सोलापूर : शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून महापालिका परिवहनला ई बस घेण्यासाठी मदत करा अशी सूचना स्मार्ट सिटी योजनेचे मिशन डायरेक्टर कुणाल कुमार यांनी  आयुक्तांना केली. स्मार्र्ट सिटी योजनेत निवड झालेल्या आठ शहरांच्या कार्यकारी अधिकाºयांची पुण्यात सोमवारी आढावा बैठक झाली. या बैठकीला सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे कार्यकारी ...

ठळक मुद्देहवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी ई बससाठी मदततीन महिन्यात कोणती कामे करावयाची याची यादी तयार ठेवा - कुणाल कुमार नागरिकांवर प्रभाव पाडतील अशी कामे प्राधान्याने हाती घ्या -कुणाल कुमार

सोलापूर : शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून महापालिका परिवहनला ई बस घेण्यासाठी मदत करा अशी सूचना स्मार्ट सिटी योजनेचे मिशन डायरेक्टर कुणाल कुमार यांनी  आयुक्तांना केली. 

स्मार्र्ट सिटी योजनेत निवड झालेल्या आठ शहरांच्या कार्यकारी अधिकाºयांची पुण्यात सोमवारी आढावा बैठक झाली. या बैठकीला सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे कार्यकारी अधिकारी तथा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे उपस्थित होते. मिशन डायरेक्टर कुणाल कुमार यांनी स्मार्ट सिटी योजनेच्या कामांचा आढावा घेतला.

सुरू असलेली कामे व प्रस्तावित कामांची माहिती घेऊन नागरिकांना स्मार्ट सिटी योजनेच्या कामाचा प्रभाव दिसण्यासाठी टेंडर प्रोसेस लवकर करून कामे सुरू करा अशा सूचना त्यांनी दिल्या. स्मार्ट सिटी योजनेतील टेंडर तीन-तीन वेळा काढत बसू नका. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी आहे. कंपनीला असलेल्या खास अधिकाराचा वापर करून कामाचे योग्य नियोजन करा. येत्या तीन महिन्यात कोणती कामे करावयाची याची यादी तयार ठेवा. नागरिकांवर प्रभाव पाडतील अशी कामे प्राधान्याने हाती घ्या असे सांगितले. 

त्यानंतर महापालिका परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून काय मदत करता येऊ शकते याबाबत आयुक्त डॉ. ढाकणे यांनी मार्गदर्शन मागितले. त्यावर मिशन डायरेक्टर कुमार यांनी स्मार्ट सिटीत पर्यावरणपूरक गोष्टींवर भर देण्यात आला आहे. हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी ई बससाठी मदत देता येईल. पुणे, अहमदाबाद शहराने या बस घेतल्या आहेत. ई बसमधून मिळणाºया उत्पन्नातून होणारा खर्च जादा असेल तर तो फरक देण्याची तरतूद महापालिकेकडून करता येईल. परिवहन विभाग हा स्वतंत्र आहे. या विभागाने ठराव करून दिला तर या प्रस्तावावर विचार करू.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका